आजारी पित्याला भेटण्यासाठी जात असलेल्या शंभुदेव घुगे या पोलिस पुत्राचा अपघाती मृत्यू !
लोहा ते गंगाखेड मार्गावरील घटना नांदेड
आजारी असलेल्या आपल्या पित्याला भेटण्यासाठी मोटारसायकलवरून गंगाखेडकडे जात असलेल्या पोलिस पुत्राचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लोहा ते गंगाखेड मार्गावर शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली .
गंगाखेड येथील रहिवासी असलेले ३२ वर्षीय पोलिस अंमलदार शंभुदेव सदाशिव घुगे ( ब.नं. ८९ ) हे नांदेड येथे पोलिस मुख्यालयात कार्यरत असून नाकाबंदी बंदोबस्तासाठी ते लोहा येथे कार्यरत होते . पित्याची प्रकृती ठिक नसल्याने शंभुदेव घुगे हे शनिवारी रात्री पोलिस निरिक्षक तांबे यांची परवानगी घेवून मोटारसायकलवरून ते गंगाखेडकडे जात होते . रात्री ९ वाजताच्या सुमारास सदर दुचाकी पालम ते गंगाखेड मार्गावर आली असता वाहन क्र . एम . एच . २४ एस . १८२२ सोबत अपघात झाला . या अपघातात पोलिस शंभुदेव घुगे या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे .
शंभुदेव घुगे हे सांगोला पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांची सांगोला येथून बदली झाली होती. त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments