सोलापूर : मोहोळ पोलीसांनी पकडली मोटारसायकल चोरांची टोळी
सोलापूर (मोहोळ) : मोहोळ येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीच्या वेळी मोटर सायकल चोरा कडून एकूण बारा मोटारसायकली जप्त केल्या . या प्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.हा प्रकार मोहोळ ते अनगर जाणाऱ्या रस्त्यावर घडला. राहुल विष्णू दांडगे वय 24 ,सागर चांगदेव अंकुश वय 28, सोहेब तुराब शेख वय 24 तिघे रा अनगर ता मोहोळ अशी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शना खाली मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस नाईक अमोल घोळवे ,पोलीस नाईक प्रवीण साठे, अंमलदार सिद्धनाथ मोरे, महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर हे रात्री मोहोळ ते अनगर रस्त्यावर गस्त घालत असताना, रात्री तीन वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावर तिघेजण विना नंबर प्लेट च्या मोटरसायकलीवर फिरताना पोलीसांना दिसले. संशय आला म्हणून त्यांनी त्या तिघांना थांबण्याचा इशारा केला, मात्र ते न थांबता वेगात जाऊ लागले.
पोलीस व लोकनेते कारखान्याचा सुरक्षा रक्षक यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या बिगर नंबर प्लेट च्या मोटरसायकल बद्दल चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले व ती मोटरसायकल अनगर येथून चोरल्याचे सांगितले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोहोळ, माढा, पंढरपूर, पुणे, आंबेजोगाई या ठिकाणाहून एकूण बारा मोटरसायकली चोरल्याचे सांगितले.
गेल्या महिन्या भरापासुन मोहोळ च्या तहसील,पंचायत समिती,भुमिअभिलेख या कार्यालयाच्या आवारातुन मोटार सायकली चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते .या तिघाकडुन अनेक गुन्हे मोटार सायकलीच्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी सांगीतले.
0 Comments