google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ७६ ग्रामपंचायतींचे ३५० पाणी नमुन्यांचे परीक्षण अर्जुन चिन्नूर : सांगोला तालुक्यातील जलस्त्रोतांचा लवकरच मिळणार अहवाल

Breaking News

७६ ग्रामपंचायतींचे ३५० पाणी नमुन्यांचे परीक्षण अर्जुन चिन्नूर : सांगोला तालुक्यातील जलस्त्रोतांचा लवकरच मिळणार अहवाल

 ७६ ग्रामपंचायतींचे ३५० पाणी नमुन्यांचे परीक्षण अर्जुन चिन्नूर : सांगोला तालुक्यातील जलस्त्रोतांचा लवकरच मिळणार अहवाल



सांगोला ' सुरक्षित पाण्याची शक्ती , रोगराईपासून मुक्ती ' म्हणल्याप्रमाणे राष्ट्रीय ग्रामीण पाणी गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सांगोला पाणी परीक्षण प्रयोगशाळा केंद्र यांच्याकडे तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींमार्फत तब्बल ३५० नमुने पाणी परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत . हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणी पिण्यायोग्य की पिण्यासाठी अयोग्य याबाबतच्या सूचना पंचायत समिती यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना कळविण्यात येतील , 



अशी माहिती पाणी परीक्षण प्रयोगशाळाप्रमुखअर्जुन चिन्नूर यांनी दिली आहे . पाणी म्हणजे जीवन आहे . स्वच्छ पाणी व पिण्यासाठी योग्य असेल तर आरोग्य निरोगी राहते . अनेक आजार हे पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असतात . म्हणून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यादृष्टी वरिष्ठांच्या आदेशानुसार गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा साधनांचे नमुने तपासणी करण्यात येते . याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय ग्रामीण पाणी गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत | मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात राष्ट्रीय ग्रामीण पाणी गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण अंतर्गत



 पाण्याचेरासायनिक व जैविक , अशा दोनप्रकारे उपविभागीय प्रयोगशाळा सांगोला यांच्यामार्फत भूजल सर्वे क्षण तपासण्यात येत असतात . त्यानुसार मान्सून पश्चात राष्ट्रीय ग्रामीण पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षण अंतर्गत तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींमार्फत तब्बल ३५० नमुने रासायनिक पाणी परिक्षणअंतर्गत सांगोला येथे देण्यात आले आहे . त्याचा अहवाल येणे अजून बाकी आहे . जैविक | गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण अंतर्गत तपासण्यात आलेल्या एकूण ८५ नमुन्यांतील ४ अहवाल हे दूषित आढळून आले आहेत . उर्वरित ८१ अहवाल हे योग्य आहेत , असे तपासणीमध्ये आढळून आले आहे . 



हा अहवाल सांगोला तालुक्यातील अकोला , घेरडी , नाझरे या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नोव्हेंबर महिन्यामध्ये पाणी परीक्षण करण्यासाठी सांगोला उपविभागीय प्रयोगशाळा यांच्याकडे भूजल सर्वेक्षणासाठी पाठविण्यातआले होते , अशी माहिती पंचायत समिती यांच्याकडून देण्यात आली असून ८१ अहवाल हे पाणी पिणे योग्य असून या ग्रामपंचायतींना त्याबाबतच्या सूचना केल्या आहेत . रासायनिक गुणवत्ता संनियंत्रण वसर्वेक्षणांतर्गत पाठवण्यात साडेतीनशे नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पिण्यासाठी अयोग्य पाणी व पिण्यायोग्य पाणी याबाबतच्या सूचना पंचायत समिती यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत .

Post a Comment

0 Comments