कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत !
कोरोनाची तिसरी लाट जानेवारी - फेब्रुवारीत येण्याची शक्यता आहे . मात्र , दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही सौम्य राहील , असा इशारा कोरोनावरील राष्ट्रीय सुपरमॉडेल समितीने दिला आहे . ओमिक्रॉनमुळे डेल्टा अधिकच प्रबळ ठरेल आणि त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात होईल , असे या समितीचे प्रमुख एम . विद्यासागर यांनी सांगितले .लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढली असल्याने दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य राहण्याची शक्यता आहे .
सध्या देशभरात दररोज ७,५०० बाधित आढळत असले तरी , ओमिक्रॉनमुळे डेल्टा व्हेरिएंटला प्रबळ झाल्यास बाधितांची संख्यावाढेल , असे विद्यासागर यांनी सांगितले . तिसरी लाट देशात धडकल्यास अत्यंत वाईट परिस्थितीत दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता नाही . हा एक अंदाज असून , भाकीत नाही . देशातील लोकांना या विषाणूचा संसर्ग कितपत होतो , याची माहिती हाती आल्यावर आम्ही अंदाज व्यक्त करू शकतो , असे ते म्हणाले . सरकारने १ केंद्र मार्चपूर्वी लसीकरण मोहीम

0 Comments