google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात पावसाळा आणि हिवाळा हा सुरु तालुक्यात ३१. ८ मिमी पाऊस

Breaking News

सांगोला तालुक्यात पावसाळा आणि हिवाळा हा सुरु तालुक्यात ३१. ८ मिमी पाऊस

सांगोला तालुक्यात पावसाळा आणि हिवाळा हा सुरु तालुक्यात ३१. ८ मिमी पाऊस

सांगोला प्रतिनिधी : तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीपासून अचानक बिगर मौसमी अवकाळी पावसामुळे सांगोला शहर व तालुका ओलाचिंब झाला आहे . काल गुरुवारी दुपारी १२ पर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने सूर्यदर्शन झाले नव्हते ते दुपारी १२ नंतर झाले मात्र या अवकाळी पावसाचा फटका गहू , हरभरा , डाळिंब , द्राक्षे , पेरूसह फळ पिकांना बसणार आहे तर ज्वारी मका लागवड केलेल्या ऊसला हा ' पाऊस पोषक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले .


 दरम्यान सांगोला तालुक्यात ९ मंडलनिहाय | सरासरी ३१.८ मिमी पाऊस झाला आहे .सांगोला तालुक्यात मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणात अवकाळी पावसाची चिन्हे दिसू लागल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता तालुक्यात सध्या ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील ज्वारी  , मका , ऊस , गहू , हरभरा शेती पिकांबरोबरच डाळिंब , द्राक्षे , पेरू , ड्रॅगन फ्रुट फळबागा फळ पिकांनी बहरल्या आहेत . अशातच गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिगरमौसमी अवकाळी पाऊस पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या अवकाळी पावसामुळे गहू , हरभरा , डाळिंब , द्राक्षेसह फळ पिकांवर बुरशीजन्य रोगराईचा  प्रादुर्भाव वाढणार आहे तर शेतातील ज्वारी मका उस या पिकांना हा पाऊस पोषक असल्याचे शेतकरी सांगतात . गुरुवारी मध्यरात्रीपासून ते | दुपारी १२ पर्यंत तालुक्यात 


सर्वदूर कमी - अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे . सकाळी ७ ते ११ पर्यंत सर्वत्र रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे दिसून आले मात्र पावसाने उघडीप देताच रस्त्यावर पुन्हा लोकांची वर्दळ दिसू लागली . दरम्यान सततच्या हवामान बदलामुळे डाळिंब बागांवर रोगराईच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन वर्षापासून डाळिंबाचे पीक हातचे गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे डाळींब उत्पादक शेतकरी दिलीप नागणे यांनी सांगितले तर अवकाळी पावसामुळे शेवगा पिकाची फूलगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने यंदाचे पीक वाया गेल्याचे शेवगा उत्पादक शेतकरी यशवंत खबाले यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments