google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हाधिकारी "ऍक्शन मोड" वर ; सोलापूरकरांनो,लस घ्या अन्यथा....शंभरकरांनी दिला गंभीर इशारा

Breaking News

जिल्हाधिकारी "ऍक्शन मोड" वर ; सोलापूरकरांनो,लस घ्या अन्यथा....शंभरकरांनी दिला गंभीर इशारा

 जिल्हाधिकारी "ऍक्शन मोड" वर ; सोलापूरकरांनो,लस घ्या अन्यथा....शंभरकरांनी दिला गंभीर इशारा



सोलापूर : कोरोना संसर्गाच्या दोन लाट गेल्या, आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, omicron नावाच्या नव्या कोरोना व्हेरियंटची सध्या भीती आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या ग्रामीण भागात  6 लाख तर शहरी भागातील 2 लाख नागरिकांनी अद्यापही लस घेतली नाही. 'Omicron'चा संसर्ग वाढू नये म्हणून  राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरण एकमेव पर्याय असल्याने लसीकरण मोहीम वेगाने सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.


जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस प्रशासन, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा पुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ दिपाली धाटे, उपायुक्त वैशाली कडुकर, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी शंभरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना लसीकरण आकडेवारी सांगून त्यांनी प्रथम नाराजी व्यक्त केली, महापालिका प्रवेशद्वार, रेशन दुकाने, सेतू कार्यालय, झोन कार्यालय, बिग बझार, डी मार्ट अशा ठिकाणी लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश द्या अशा सक्त सूचना केल्या, पोलीस संरक्षण घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Post a Comment

0 Comments