2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी, मोदी सरकारने दिली महत्वाची माहिती
नवी दिल्ली – देशात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांची संख्या बाजारात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कमी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे या नोटा चलनातून बाद होतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी केली होती, ज्यानंतर आता पुन्हा 2021 मध्ये देखील केंद्र सरकार नोटाबंदी करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
त्यातच चलनात कमी दिसणाऱ्या 2000 आणि 500 रुपयांच्या नोटाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आज सरकारने 2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी माहिती दिली आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात नोटांची संख्या का कमी झाली या मागचे कारण सरकारने सांगितले आहे.
यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बाजारात चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांची संख्या ही 223.3 कोटी इतकी होती. हे प्रमाण एकूण नोटांच्या (NIC) 1.75 टक्के इतके टक्के आहे. तसेच मार्च 2018 मध्ये चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा या 336.3 कोटी होत्या, अशी माहिती केंद्र सरकारकडून आज राज्यसभेत देण्यात आली.
राज्यसभेत अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. विशेष किंमतींच्या नोटा छापण्याचा निर्णय सरकारने रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करुन व्यवहारात सुलभता आणण्यासाठी घेतला आहे. इच्छित मूल्यांच्या नोटांची उपलब्धता ही जनतेची मागणी राखण्यासाठी आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी केली जाते, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली.
पंकज चौधरी काय म्हणाले?
चौधरी म्हणाले, “31 मार्च, 2018 पर्यंत, 2 हजार रुपयांच्या 336.3 कोटी नोटा (MPCs) चलनात होत्या, जे प्रमाण आणि मूल्याच्या संदर्भात NIC च्या अनुक्रमे 3.27 टक्के आणि 37.26 टक्के आहेत. तुलनेत, नोव्हेंबर 26, 2021 पर्यंत, 2 हजार 233 MPC कार्यरत होते, जे खंड आणि मूल्याच्या दृष्टीने NIC च्या अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्के आहे. चौधरी पुढे म्हणाले की, 2018-19 या वर्षापासून नोटांसाठी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन इंडेंट टाकण्यात आलेला नाही.
2 हजार रुपयांच्या नोटा का कमी झाल्या?
“नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांचे चलन कमी होण्याचे कारण म्हणजे 2018-19 या वर्षापासून या नोटांच्या छपाईसाठी कोणताही नवीन इंडेंट म्हणजेच मागणी पत्र ठेवण्यात आलेलं नाही. याशिवाय, लोकं त्याला अशा प्रकारे वापरतात, ज्यामुळे नोटाही खराब होत आहेत. त्यामुळे या नोटांचं प्रमाण सध्या बाजारात कमी झालं आहे”, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली.

0 Comments