google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला मार्केट यार्डसमोर अपघात ; १ जण ठार

Breaking News

सांगोला मार्केट यार्डसमोर अपघात ; १ जण ठार

 सांगोला मार्केट यार्डसमोर अपघात ; १ जण ठार



सांगोला ( प्रतिनिधी ) : - बिहार प्रांतातून मजुरीसाठी आलेल्या दोन मजुर काम करून घरी जात असताना एका अनोळख्या मोटरसायकलने या मजूरांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण ठार तर १ जण जखमी झाला आहे . हा अपघात ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील मार्केट यार्डसमोर झाला आहे . 


फिर्यादी मोहम्मद सैजादखान ( रा . बिहार सशप , जि . नालंदा ) व " अब्दुल वारीस ( रा . निजाम मोहम्मदपुर बादल , जिल्हा - मुजापूर , राज्य बिहार ) हे बिहारहुन मोलजूरीकरिता सांगोल्यात -एका खोलीत राहत होते . ६ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात ते साडे सातच्या सुमारास हे दोघे मजूर मोटरसायकलवरून काम करून सांगोला मार्केट यार्डमधुन बाहेर पडत 


असताना पंढरपूरकडून सांगोल्याकडे एक मोटरसायकल भरधाव वेगाने येवुन त्यांच्या मोटरसायकली जोराची धडक दिली . यावेळी मोटारसायकल चालक मोहम्मद शाहरुख मोहम्मद सैजादखान जखमी झाले तर अब्दुल वारीस गंभीर जखमी होऊन उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेले . असता  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे . याबाबतची फिर्याद मोहम्मद शाहरुख मोहम्मद सैजादखान यांनी पोलीसांना दिली आहे .

Post a Comment

0 Comments