करोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'नं मुळे सांगोला तहसील ने घेतली खबरदारी.. लसीकरणाचे सर्टिफिकेट पाहूनच तहसीलमध्ये एन्ट्री
सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज )करोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'नं जगभरात टेन्शन वाढवलं असतानाच आता आणखीन धक्कादायक माहिती समोर आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या ज्या प्रांतात 'ओमिक्रॉन' व्हेरियंट सर्वात पहिल्यांदा आढळून आला होता, त्या भागातील रुग्णालयांत रुग्णसंख्येत तब्बल ३३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर येतंय. ही जगाला हादरा देणारी गोष्ट आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये खबरदारी व उपायोजना सुरुवात झालेले आहे त्याचा भाग म्हणून सांगोला तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या पक्ष करांसाठी दोन लसी घेतलेल्या व्यक्ती चे सर्टिफिकेट तपासूनच व मास्क लावलेला पाहूनच आत मध्ये पक्षकारांना एन्ट्री दिली जात आहे
करोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'नं मुळे सांगोला तहसील ने घेतलेली खबरदारी घेतल्यामुळे सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील यांचे संपूर्ण तालुक्यांमध्ये कौतुक केले जात आहे पुढील काळामध्ये तहसिल कचेरी मध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी आपले वेक्सिंन घेतल्या बाबतचे सर्टिफिकेट घेऊन यावे लागणार आहे अशा आशयाचा बोर्ड तहसील गेटला लावलेला आहे तसेच शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा पद्धतीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे
0 Comments