google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अत्याचार करून 7 वर्षीय मुलीचा खून ; संशयिताला पोलिसांनी केली अटक

Breaking News

अत्याचार करून 7 वर्षीय मुलीचा खून ; संशयिताला पोलिसांनी केली अटक

 अत्याचार करून 7 वर्षीय मुलीचा खून ; संशयिताला पोलिसांनी केली अटक



पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात एका गावात सात वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे . सदर मुलीचा मृतदेह काल रात्री गावाशेजारीच असणाऱ्या डोंगरातील दरीत आढळून आला . 


अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी गावातीलच संतोष चंद्रु थोरात या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे . अत्याचार करून हत्या करण्यात आलेली सात वर्षीय मुलगी दुसरीच्या वर्गात शिकते . ती काल दुपारी साडेतीनच्या सुमारास बाहेर खेळायला गेली , 



मात्र उशिरापर्यंत घराकडे परतली नाही . गिरणीतून दळण घेऊन घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली . मात्र ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळवण्यात आले . खुद्द गृहराज्यमंत्री शंभूराज दोसाई यांच्या मतदारसंघांत ही घटना घडल्याने पाटण पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत आरोपीला गजाआड केलं आहे . 



पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत रात्रभर कसून तपास केला . एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता पहाटे त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे .

Post a Comment

0 Comments