google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषद करणार शहरातील पथविक्रेत्यांच्या आरोग्याची तपासणी - आझादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजन

Breaking News

सांगोला नगरपरिषद करणार शहरातील पथविक्रेत्यांच्या आरोग्याची तपासणी - आझादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजन

 सांगोला नगरपरिषद करणार शहरातील पथविक्रेत्यांच्या आरोग्याची तपासणी 


आझादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजन


सांगोला (प्रतिनिधी) :आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाली आहे आणि या गौरवशाली पर्वा निमित्त आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त देशभर विविध शासकीय कार्यालयांमार्फत वेगवेगळे कार्यक्रम / उपक्रम राबविले जात आहेत.



याचाच एक भाग म्हणून सांगोला नगरपरिषदेने शहरातील अजिंक्यतारा मल्टीके अर हॉस्पिटल यांच्या मदतीने शहरातील पथ विक्रेत्यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. कैलास केंद्रे यांनी दिली.



शहरातील पथविक्रेते यांच्या आरोग्य तपासणीच्या ह्या शिबीराचे आयोजन दि. ०१ जानेवारी २०२२ वार शनिवार रोजी केले आहे. या सामाजिक उपक्रमात सांगोला शहरातील सुप्रसिद्ध अजिंक्यतारा मल्टीकेअर हॉस्पिटलचे डॉ. अजिंक्य नष्टे यांनी सामजिक बांधिलकी म्हणून मोफत स्वरूपात ही तपासणी करून करण्याचे कळवून आपला सहभाग नोंदविण्याचे ठरवले आहे. या आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत CBC, शुगर व ECG B टेस्ट मोफत करण्यात येणार असून शहरातील जास्तीत जास्त पथविक्रे त्यांनी फेरीवाल्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेणे बाबतचे आवाहन नगरपरिषद सांगोला यांच्या वतीने करण्यात येत आहे.



या आरोग्य शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, लेखापरीक्षक विजय कन्हेरे, समुदाय संघटक योगेश गंगाधरे यांच्यावर सोपविली असल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिली.



रोजच्या व्यवसायाच्या माध्यमातून पथविक्रेते असंख्य लोकांशी भेटत असतात तसेच त्यांचे नकळत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. म्हणूनच आझादी का अमृत मोहोत्सव अंतर्गत सांगोला नगरपरिषद पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहे. यामध्ये बहुसंख्य पथविक्रेत्यांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा..

•श्री कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, सांगोला

Post a Comment

0 Comments