सासर्याची सुनेवर पडली वाईट नजर सांगोला तालुक्यातील घटना
सांगोला : नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासर्याची आपल्याच सुनेवर वाईट नजर असल्याची एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर सासरी जाणारी सून सासर्याला वडिलांच्या जागी तर सासूला आई मानते.
मात्र सांगोला तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सासर्याने आपल्या सुनेकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. सुनेने नकार देताच सासर्याने तिला मारहाण करून घराबाहेर काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुनेने सासर्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित २८ वर्षीय महिलेचे सांगोला तालुक्यातील एका गावातील तरुणाशी मे २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरू होता. लॉकडाऊनच्या काळात पत्नीला सासरी ठेवून पती परराज्यात कामास गेला होता. मात्र, काही दिवसांनी सासर्याची आपल्या सुनेवर वाईट नजर पडली. काही ना काही कारणाने सासरा आपल्या सुनेशी जवळीक करू लागला. तसेच तिच्यावर वाईट नजर ठेवून शिवीगाळ करू लागला.
ऑक्टोबर २०२१ मध्ये एके दिवशी रात्रीच्या सुमारास सून बेडरूममध्ये एकटीच असल्याचे पाहून सासर्याने माझ्याशी शरीरसंबंध ठेव असे म्हणत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरची बाब भीतीपोटी सुनेने कोणालाही सांगितली नाही. त्यांनतर सासर्याने माझ्याशी शरीरसंबंध ठेव असे म्हणून मारहाण करून सुनेला घराबाहेर काढले. पीडित महिलेने पतीला व सासूला घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्या दोघांनीही तिची दखल घेतली नाही. अखेर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात सासर्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
0 Comments