google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

Breaking News

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार 



पुण्यामध्ये  महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार  केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असतानाच हिंजवडीमध्ये एका महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार  केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुणे जिल्ह्यात  खळबळ उडाली आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील सुसगांव येथे गुरुवारी (दि.16) घडली आहे.


याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी राजेंद्र नागनाथ जाधव (वय-40 रा.सुसगांव, मुळशी) याला अटक  केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.16) दुपारी 12.30 ते 12.50 या दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव हा पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने महिलेला ओढत दुसऱ्या खोलीत नेले व दरवाजा आतून बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार  केला. 


पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.

पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर  व पोलीस उपनिरीक्षक काकडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments