पुण्यात अल्पवयीन मुलीसोबत बापाचं विकृत कृत्य; 15 दिवसांपासून सुरू होता भयावह प्रकार
अलीकडेच हवेली तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुण्यात नात्याला काळिमा फासणारी लज्जास्पद घटना समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच पुण्यातील हवेली तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुण्यानजीक असणाऱ्या चिंचवडमध्ये नात्याला काळिमा फासणारी लज्जास्पद घटना समोर आली आहे. चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी येथे एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं आहे.
पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर, या घटनेला वाचा फुटली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी 43 वर्षीय पित्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, 43 वर्षीय नराधम आरोपी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात आपल्या पत्नी आणि मुलीसोबत वास्तव्याला आहे. आरोपी वडील हा मजुरीचं काम करतो.
गेल्या काही दिवसांपासून नराधम आरोपी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत तिचा लैंगिक छळ करत होता. 9 ते 24 डिसेंबर दरम्यान आरोपीनं अनेकदा पीडित मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. 15 दिवसांपासून आरोपी बापाकडून सुरू असलेला त्रास सहन न झाल्याने अखेर पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे.
मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर, शुक्रवारी पीडित मुलीच्या आईने थेट चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
0 Comments