‘काँग्रेस सोडणाऱ्यांची विल्हेवाट लावणार’; सुशीलकुमार शिंदे यांचा इशारा
काँग्रेस पक्षावर आत्तापर्यंत तीनवेळा मोठी संकटे आली. संकटांचा सामना करत काँग्रेस उभी राहिली. काँग्रेस संपली अशी वल्गना करणारे स्वत: संपतील पण काँग्रेस संपणार नाही. स्व. इंदिरा गांधी यांना जेव्हा अटक झाली होती. त्याकाळीही काँग्रेस संपली, असे वक्तव्य करण्यात येत होती. पण काँग्रेस त्याच जिद्दीने उभी राहिली.
काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यांची विल्हेवाट लावणार असल्याचा इशारा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला. सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस भवन येथे बोलविण्यात आली होती. बैठकीदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी सडेतोड भाषण करत पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा खरपूस समाचार घेतला.
काँग्रेस पक्षावर आत्तापर्यंत तीनवेळा मोठी संकटे आली. संकटांचा सामना करत काँग्रेस उभी राहिली. काँग्रेस संपली अशी वल्गना करणारे स्वत: संपतील पण काँग्रेस संपणार नाही. स्व. इंदिरा गांधी यांना जेव्हा अटक झाली होती. त्याकाळीही काँग्रेस संपली, असे वक्तव्य करण्यात येत होती. पण काँग्रेस त्याच जिद्दीने उभी राहिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूलथापेला बळी न पडता ताकदीने कामाला लागले पाहिजे. महाविकास आघाडी सरकार पूर्ण कार्यकाळ करेल, सरकारवर राष्ट्रपती राजवट लागण्यासारखं कोणतही संकट नाही. राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी भारतीय संविधानात नियमावली आहेत. याचा आभ्यास भाजप प्रदेशाध्यक्षांनी करावा, असा टोला सुशीलकुमार शिंदे यांना चंद्रकांत पाटील यांना लगावला.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते नेते इतर पक्षात जात आहेत. ज्या पक्षांनी मोठं केलं त्याच पक्षात ते परत येतील, असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. काँग्रेस सरचिटणीस सोनम पटेल यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन भाषणातून केले.यावेळी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी आमदार निर्मला ठोकळ , विश्वनाथ चाकोते, अलका राठोड, चेतन नरोटे, बाबा करगुळे, विनोद भोसले, गणेश डोंगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रणितीताई खरं बोलल्या…
लोकसभा निवडणुकीत रक्त आणि भक्तमुळे माझा पराभव झाला. प्रणितीताई शिंदे यांनी हे खरंच सांगितले. फक्त राजकीयद्वेषापोटी प्रणितीताईंना टार्गेट करण्यात येत आहे. लोकसभेची निवडणूक जात अन् धर्मावर झाल्याचेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
0 Comments