शहरातील सुमारे 80 लाख रूपयांच्या कामांस मिळणार मंजुरी
लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांची माहिती
सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरातील विविध विकासकामे घेवून लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दि. 28 डिसेंबर रोजी स्थायी समितीची बैठक घेण्यासाठी अजेंडा काढला असून त्यामध्ये पाणीपुरवठा, बांधकाम व इतर विभागाचे एकूण 55 विषय घेण्यात आले आहेत. तसेच यामध्ये अंदाजपत्रक मंजूरी मिळणार्या विकासकामांची रक्कम सुमारे 80 लाख रू. असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.
यामध्ये धनगर गल्ली येथे आरक्षण क्र. 24 गाळ्याशेजारील मुतारीजवळील मोकळ्या जागेत काँक्रीटीकरण करणे- 1 लाख 38 हजार 788 रू, पंढरपूर रोड ते नरूटे वस्ती कडे जाणार्या रस्त्यावर सीडी वर्क करणे- 1 लाख 47 हजार 313 रू, भिमनगर येथे सुहास बनसोडे घराजवळील बोळात पेव्हींग ब्लॉक बसविणे- 36 हजार 395 रू, भिमनगर येथे सतिश बनसोडे घर ते मुख्य गटारीपर्यंत आरसीसी गटार करणे- 61 हजार 634 रू, जलशुध्दीकरण गेटच्या दक्षीण बाजूच्या खुल्या जागेत पेव्हींग ब्लॉक बसविणे- 1 लाख 92 हजार 713 रू, भिमनगर येथे बालक पुजारी घर ते गोरख बनसोडे घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक बसविणे- 1 लाख 22 हजार 670 रू,
भिमनगर येथे माणिक बनसोडे घराजवळ पेव्हींग ब्लॉक बसविणे- 43 हजार 135 रू, गोंधळगल्ली येथे विष्णू जाधव घर ते जहाँगीर मुलाणी घरापर्यंत गआर करणे- 1 लाख 89 हजार 649 रू, गोंधळगल्ली येथे अनिल बिनवडे घर ते इन्नुस मुलाणी घरापर्यंंत गटार करणे- 1 लाख 76 हजार 839 रू, अलराईन नगर येथे रफिक तांबोळी नगरसेवक घर ते कडलास रोडपर्यंत आरसीसी पाईप गटार करणे- 1 लाख 70 हजार 457 रू, भिमनगर येथे अभिमन्यू घर ते गौतम बनसोडे घरापर्यंत गटारीवर स्लॅब टाकणे- 1 लाख 99 हजार 128 रू,
धनगर गल्ली येथे गाडेकर दुकान ते कचेरी रस्त्यापर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 42 हजार 564 रू, लोहार गल्ली येथे बायडाबाई मस्के घर ते माणदूत एक्सप्रेस कार्यालयापर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 16 हजार 973 रू, लिंगेवस्ती येथे राजकुमार पतंगे घराकडे जाणार्या रस्त्यावर सीडी वर्क करणे- 1 लाख 24 हजार 760 रू, चिंचोली रोड येथे रमजान नदाफ घरासमोर सीडी वर्क करणे- 1 लाख 24 हजार 760 रू, माने घर ते तारळेकर घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे- 1 लाख 99 हजार 778 रू, चिंचोली रोड ते भोसलेवस्ती रस्ता डांबरीकरण करणे- 1 लाख 96 हजार 017 रू,
नगरपरिषद कार्यालयाचे नवीन प्रशासकीय इमारतीस नामफलक बसविणे- 9 हजार 548 रू, पंढरपूर रोड ते चंद्रकांत जानकर घरापर्यंत रस्ता मुरमीकरण करणे- 1 लाख 33 हजार 745 रू, जांगळे वस्ती येथे जयराम काळे घरासमोर सीडी वर्क करणे- 1 लाख 26 हजार 225 रू, माने घरापाठीमागील रस्ता काँक्रीटीकरण करणे- 59 हजार 979 रू, जांगळे वस्ती येथे विनायक कुलकर्णी घराजवळ सीडी वर्क बांधणे- 1 लाख 26 हजार 278 रू,
जांगळेवस्ती येथे आप्पासाहेब शिवाजी दिघे घराजवळ सीडी वर्क बांधणे- 1 लाख 26 हजार 171 रू, वाढेगांव रोड मल्लिकार्जुन घोंगडे घराजवळ सीडी वर्क करणे-1 लाख 31 हजार 530 रू, माने घर ते तारळेकर घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक टाकणे- 1 लाख 98 हजार 149 रू, मिरज रोड गौरी पेट्रोल पंपाचे पाठीमागे शेंबडे घर ते मेन गटार पर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 99 हजार 912 रू, मिरज रोड गौरी पेट्रोल पंपाचे पाठीमागे अशोक आलदर घर ते शेंबडे घरापर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 99 हजार 912 रू,
शिवाजीनगर येथे विलास साळुंखे घर ते नंदकुमार चंदनशिवे घर आरसीसी पाईप गटार करणे- 1 लाख 87 हजार 431 रू, शिवाजीनगर येथे डॉ. संतोष शिंदे घर ते जितेंद्र जाधव घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे- 1 लाख 99 हजार 710 रू, चिंचोली रोड येथे विजय करडे घराकडे जाणार्या रस्त्यावर सीडी वर्क करणे- 1 लाख 55 हजार 660 रू, परीट गल्ली येथे लखन चव्हाण घर ते सुपेकर घरापर्यंत आरसीसी गटार करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे- 1 लाख 99 हजार 261 रू,
जुना मेडशिंगी रोड ते ननवरे घर ते चिंतामणी नागणे घरापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे- 1 लाख 98 हजार 189 रू, जुना मेडशिंगी रोड ते संजय इंगोले घर ते शेंडे घरापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे- 1 लाख 99 हजार 615 रू, कोष्टी गल्ली येथे हॉटेल के.के. ते कुमठेकर घर मुख्य गटारीपर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 99 हजार 905 रू, कोष्टी गल्ली येथे चौंडेश्वरी मंदिर ते भास्कर सपाटे दुकानापर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 98 हजार 490 रू,
यशनगर व बौध्दविहार येथे रस्त्यात पॅचवर्क करणे- 1 लाख 96 हजार 629 रू, मणेरी गल्ली येथे महिमकर घर ते निराळी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे- 1 लाख 99 हजार 878 रू, कोष्टी गल्ली येथे वेदपाठक ज्वेलर्स ते डॉ. बाबर पर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 99 हजार 830 रू, कोष्टी गल्ली येथे सिटी पोस्ट ऑफिस ते वेदपाठक ज्वेलर्स पर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 99 हजार 334 रू,
सांगोला शहरात विविध ठिकाणी मुरूम टाकणे- 1 लाख 98 हजार 776 रू, जांगळेवस्ती येथे प्रभाकर महादेव जांगळे घराजवळ सीडी वर्क करणे- 1 लाख 26 हजार 251 रू, कोष्टी गल्ली येथे कांबळे कलेक्शन ते मेन रोडपर्यंत गटारीवर स्लॅब टाकणे- 1 लाख 37 हजार 772 रू, कोष्टी गल्ली येथे टकले घर ते पवार घरापर्यंत गटार करणे- 65 हजार 686 रू,
कोष्टी गल्ली येथे बोत्रे घर ते हळ्ळीसागर घरापर्यंत गटार करणे- 1 लाख 83 हजार 561 रू, भोपळे रोड येथे मुन्ना देशमुख घर ते भोपळे रोडपर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 15 हजार 838 रू, वासूद रोड लगतचे पाण्याचे उंच टाकीस रंग देणे-93 हजार 744 रू, अंबिकादेवी मंदिराजवळ पाण्याचे उंच टाकीस रंग देणे- 62 हजार 809 रू, जलशुध्दीकरण केंद्र इमारतीस व पंपहाऊसला रंग देणे- 1 लाख 99 हजार 578 रू,
अंबिकादेवी पाण्याचे टाकीचे जागेस पूर्व बाजूस चैनलिंग जाळीचे कुंपन करणे- 1 लाख 62 हजार 601 रू, जलशुध्दीकरण केंद्र येथे पाणीशुध्दीकरणासाठी नवीन क्लोरीनेटर बसविणे- 1 लाख 98 हजार 136 रू, सोमनाथ पैलवान मंगल कार्यालय ते तानाजी बिले घरापर्यंत पाईपलाईन टाकणे- 91 हजार 862 रू, वाढेगांव रोड येथे बंधन पॅलेसजवळ शंकर मेटकरी घर ते तानगावडे घरापर्यंत पाईपलाईन टाकणे- 66 हजार 009 रू. अशा प्रकारचे विषय घेण्यात आले आहेत.
या सर्व विषयांना स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर सदर कामांचे प्रसिध्दीकरण करून ही सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावली जातील, असे आश्वासन सुध्दा यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिले.
0 Comments