google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गंभीर | पंढरपूर पोलिसांनी रोखला हा प्लॅन | 13 व 15 वर्षीय मुलींची केली सुटका | जिल्ह्यातील कुठली घटना

Breaking News

गंभीर | पंढरपूर पोलिसांनी रोखला हा प्लॅन | 13 व 15 वर्षीय मुलींची केली सुटका | जिल्ह्यातील कुठली घटना

 गंभीर | पंढरपूर पोलिसांनी रोखला हा प्लॅन | 13 व 15 वर्षीय मुलींची केली सुटका | जिल्ह्यातील कुठली घटना




पंढरपूर : केंद्र सरकार  मुलींच्या लग्नाचे वय अठरा ऐवजी 21 करण्याचा कायदा  आणण्याच्या प्रयत्नात आहे. एकीकडे सरकार असा विचार करत असताना दुसरीकडे मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये मानसिकता बदलली नाही. मुलीस १८ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच वर पक्षाकडून स्वीकारले जात आहे. असेच दोन बालविवाह (Child Marriage) पंढरपूर पोलिसांनी उधळून लावले आहेत आणि या अल्पवयीन वधूंची सुटका करण्यात यश मिळवले आहे.



माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथील १३ वर्षीय मुलीचा बालविवाह, पंढरपूर तालुक्यातील आजोती येथील एका युवकाशी होणार असल्याची माहिती, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना मिळाली होती. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस अंमलदार परशुराम शिंदे,श्रीराम ताटे, बालाजी कदम, यांच्यासह त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन अल्पवयीन मुलीचा विवाह होण्यापूर्वीच थांबविला, आणि सदर मुलीस महिला व बालकल्याण समिती सोलापूर यांचे समक्ष हजर केले.



याचवेळी अकलूज येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह, सोलापूर येथील युवकाशी होणार होता. हा विवाह मस्के वस्ती, तिसंगी येथे होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,पोलीस उपनिरीक्षक केदार, पोलीस अंमलदार कर्चे, बाबर, सावंत, इंगोले यांच्यासह पथकाने सदर ठिकाणी जाऊन हा बालविवाह होण्यापूर्वीच थांबविला. आणि संबंधित बालवधूस महिला व बालकल्याण समिती पुढे समक्ष हजर केले. तसेच सदर मुलींच्या पालकांना, कायद्याची माहिती देऊन, योग्य प्रकारे समुपदेशन करण्यात आले.



पंढरपूर तालुका पोलीस तसेच ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई, निश्चितच स्वागतार्ह आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार, बालविवाह करणे हा गुन्हा आहे. आपल्या आजूबाजूस अशा अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत असल्यास, तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात यावी, माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाईल,असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.



पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तसेच आजोती येथे होऊ लागलेले दोन बालविवाह, पंढरपूर ग्रामीण तसेच तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने समक्ष जाऊन रोखले आहेत. यावेळी संबंधित अल्पवयीन मुलींच्या पालकांना कायद्याची माहिती देऊन, समुपदेशन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments