अधिवेशनावर कोरोना सावट
आमदारासह ३२ जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह
राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दोन दिवसांच्या कामकाजासाठी अनिवार्य असलेल्या कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीत भाजप आमदार समीर मेघे यांच्यासह ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अधिवेशनावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेल्या आठवड्यात विधानभवन प्रशासनाच्यावतीने तपासणी शिबीर आयोजित केले होते. यामध्ये १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आठावड्यासाठी चाचण्या केल्या असून यामध्ये ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये काही पत्रकार, पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अधिवेशनात चिंता वाढली आहे.
या अधिवेशनासाठी विधानभवनाचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, पोलीस, पत्रकार, मंत्रालय अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर विधान परिषद, विधानसभा सदस्य यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आहे. अधिवेशनाचे अद्याप दोन दिवस शिल्लक आहेत.
0 Comments