सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ . राणीताई आनंदा माने यांच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत झालेल्या कामांची माहिती
सांगोला नगरपरिषद सांगोला दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ( DAY - NULM ) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित आहे . सदर योजना ही शहरी आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचविण्याकरीता सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली आहे .
या अनुषंगाने शहरातील दारिद्रय रेषेखालील नागरिकांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत करण्यात आलेली कामे खालीलप्रमाणे
१ ) स्थापन करण्यात आलेले महिला बचत गट : - १५३
२ ) स्थापन करण्यात आलेली वस्तीस्तर संघ : - १०-१५ बचत गटांचे मिळून १ वस्तीस्तर संघ स्थापन करण्यात येतो . आजपर्यंत एकूण स्थापन वस्तीस्तर संघ : - ७ प्रती गट रक्कम रू . १०,००० / :
३ ) बचत गटांना वाटप करण्यात आलेला फिरता निधी प्रमाणे आत्तापर्यंत फिरता निधी वाटप केलेले गट - १३८
४ ) वस्तीस्तर संघास वाटप करण्यात आलेला फिरता निधी : - आत्तापर्यंत वाटप ६ वस्तीस्तर संघास प्रत्येकी ५०,००० / - प्रमाणे ३,००,००० / - निधी वाटप :
५ ) बचत गटांना सवलतीच्या व्याज दरात वाटप करण्यात आलेले एकूण कर्ज द.सा.द.शे. ४ % व्याज दराने आतापर्यंत ७ ९ बचत गटांना ९ ७ लाखापर्यंतचे कर्ज वाटप
६ ) सवलतीच्या व्याज दरात वाटप करण्यात आलेले वैयक्तिक कर्ज : द.सा.द.शे. ७ % व्याज दर तसेच आतापर्यंत ४७ लाभार्थी यांना ४५ लाखापर्यंत कर्ज वाटप
७ ) कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत शहरातील १६ ९ युवक - युवतींना ब्युटीपार्लर , वेब डिझायनींग , फॅशन डिझायनींग , शिवणक्लास इ . प्रशिक्षण देण्यात आले .
८ ) सांगोला शहरातील पथविक्रेत्यांचे मोबाईल अॅपद्वारे करण्यात आलेले सर्वेक्षण : २ ९ १ पथ विक्रेते
९ ) कोविड १ ९ महामारीमध्ये व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झालेल्या १ ९ ८ फेरीवाल्यांना PMSVANidhi अंतर्गत १०,००० / - रू . इतके कर्ज बँकेमार्फत देण्यात आले आहे .
पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आमच्याकडून जेवढी कामे करता येतील , तेवढी कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे व ही कामे करण्यासाठी तुम्ही जनतेने आम्हाला संधी दिली , त्याबद्दल सर्व शहरवासियांचे आभार ....
0 Comments