google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

Breaking News

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

 राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा


 राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान राज्यातील शाळा सुरु होण्याबाबत आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी नुकतीच घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शाळा या एक डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे वर्ष गायकवाड यांनी सांगितले. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पहिली ते दहावीचे वर्ग सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, कोरोना संक्रमणामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी शाळा पुन्हा सुरु करणार असल्याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे.


पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली होती. राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवा कंदिल दाखवला होता. राज्यात कोविड-१९ संक्रमणग्रस्तांची संख्या गेले काही महिने सातत्याने कमी होत आहे. परिणामी परिस्थिती सामान्य होत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करत आणले आहेत.

Post a Comment

0 Comments