google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सासुने पाजले विषारी द्रव पतीने फोनवरून दिली धमकी

Breaking News

सासुने पाजले विषारी द्रव पतीने फोनवरून दिली धमकी

 सासुने पाजले विषारी द्रव पतीने फोनवरून दिली धमकी


सांगोला / प्रतिनिधी 1 चारित्र्याच्या संशयावरून सासूने सुनेला शिवीगाळ करून घरातील फरशी पुसण्यासाठी आणलेले ' लायझल ' हे विषारी द्रव जबरदस्तीने पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला . दरम्यान , पतीने फोनवरून तिला मी तुला नांदवणार नाही , अशी धमकी देऊन शिवीगाळ केली . ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घेरडी ( ता . सांगोला ) येथे घडली . याबाबत पिडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार सासू शालन दादासो गैंड व पती रणजीत गेंड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला . याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , 


सांगोला तालुक्यातील घेरडी येथील रणजित गेंड यांचेशी पिडितेच्या माहेरी घोरपडी ( ता . कवठे महांकाळ , जि . सांगली ) येथे २ ९ जुलै २०२१ रोजी लग्न झाले होते . लग्नानंतर काही दिवसातच पती रणजित नोकरीच्या ठिकाणी ( दिल्ली ) येथे हजर होण्यास गेला होता . दरम्यानच्या काळात सासू शालन हिने सुनेवर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण करीत होती . ती गरोदर असल्याने आजारी पडली होती . दरम्यान , आजारातून बरी झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला सासरी ( घेरडी ) येथे आणून सोडले होते . बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातील फरशी दुर्गंधी येत असल्याने तिने डेटॉल व लायझलने पुसून घेतली . तेव्हा , सासु शालन हिने सुनेस चिवडा व चखली आणण्यास सांगून टीव्ही चालू करण्यास सांगितले . 


तिने टीव्ही चालू करून खुर्चीवर बसत असताना सासूने अचानक तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून खाली पाडून दोन्ही हातावर पाय दिले . व तेथेच असलेल्या लायझर बाटलीतील लिक्वीड तिचे तोंड धरून पाजले . अचानक हा प्रकार घडल्यामुळे तिला चक्कर येऊ लागल्यानंतर सासु शालनने मिठाचे पाणी पाजले असता तिची उलटी झाली . त्यावेळी सासुने सुनेला तुला पित्त झाल्याचे सांगितले . या प्रकारानंतर तिला खूपच चक्कर येऊ लागल्याने सासुने भाचा तुकाराम गळवे यास बोलून घेऊन सुनेला उपचाराकरिता सांगोला येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले . 

अशा अवस्थेत पतीने तिला फोन करून मी तुला नांदवणार नाही . तु तुझ्या आई वडिलांकडे जा . तुझ्यासारख्या मला ५६ मुली मिळतील असे म्हणून शिवीगाळ करीत धमकी दिल्याचे तिने पोलिसांना जबाबात सांगितले .

Post a Comment

0 Comments