google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर :'राष्ट्रवादी'च्या वाटेवरील दोन 'भाचे' मामांच्या भेटीला ; असा केला सत्कार

Breaking News

सोलापूर :'राष्ट्रवादी'च्या वाटेवरील दोन 'भाचे' मामांच्या भेटीला ; असा केला सत्कार

 सोलापूर :'राष्ट्रवादी'च्या वाटेवरील दोन 'भाचे' मामांच्या भेटीला ; असा केला सत्कार


सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे  मामा यांनी सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची पॉवर वाढवण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री पदाच्या असून मामा पक्षासह आपला गट सुद्धा मजबूत करत असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या नेत्यांना भरणे मामा आणखीच जवळ घेत आहेत, त्यांना डीपीसी तून मोठा निधी देत आहेत. सोलापूरात मुस्लिम समाजात नगरसेवक तौफिक शेख यांचे मोठे  वर्चस्व आहे, त्यांच्या पाठीशी 5-6 नगरसेवक आहेत, त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणे जवळपास निश्चित झाले आहे. 

दुसरीकडे मात्र मामा-मामा म्हणत जवळ गेलेले नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याने आंबेडकरी समाज कमालीचा नाराज असल्याचे बोलले जाते, शरद पवार यांच्या दौऱ्यात सुद्धा चंदनशिवे स्टेजवर दिसले नाहीत, काहीसे लांब दिसत आहेत मात्र ते भरणे मामांच्या अतिशय जवळ गेले आहेत. त्यामुळे आनंद दादांचे राजकीय गणित समजणे मुश्कील असल्याचे चित्र आहे.


डीपीसी बैठकीत मामांनी आपल्या भाच्याना अपेक्षेपेक्षा जास्त निधी दिल्याने त्यांची दिवाळी चांगली झाली. म्हणूनच दिवाळी सण झाल्यानंतर  रविवारी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भरणेवाडी येथील निवासस्थानी नगरसेवक आनंद चंदनशिवे ,गटनेते किसन जाधव,  नगरसेवक तोफिक शेख, नगरसेवक गणेश पुजारी, चेतन गायकवाड, इरफान शेख  यांनी सदिच्छा भेट घेऊन दिवाळीनिमित्त व त्याचबरोबर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.या वेळी श्रीमंत आप्पा जाधव, संतोष गायकवाड, अभिजित कदम, अजमल शेख, शहबाज मतवाली, डॉ. एम आर शेख, खाजा लोकापल्ली,  शोएब शेख, निसार शेख, आडके, हुलकाप्पा, भीमा मस्के आदी उपस्थित होते. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दिवाळी निमित्त आपले नेते सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला जातात आता काही नेते मामांच्या भेटीला गेल्याची नवी प्रथा पहायला मिळाली.

Post a Comment

0 Comments