google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पळून गेलेल्या आरोपीला एका तासाच्या आत पकडले ; सांगोला पोलिसांची कामगिरी

Breaking News

पळून गेलेल्या आरोपीला एका तासाच्या आत पकडले ; सांगोला पोलिसांची कामगिरी

 पळून गेलेल्या आरोपीला एका तासाच्या आत पकडले ; सांगोला पोलिसांची कामगिरी


सांगोला : जुजारपूर (ता.सांगोला) येथील विवाहित महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीचे सांगोला ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणीसाठी देऊन पोलिस दुचाकीवरुन त्यास सबजेलकडे परत घेऊन येत होत. नेमके वाटेत रेल्वे गेटमधील वाहनांच्या गर्दीतून त्या आरोपीने पोलिसांच्या दुचाकीवरून उडी मारुन ताब्यातून पलायन केले. मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत त्यास उसाच्या पिकातून त्यास पकडले.


दरम्यान, ही घटना काल रविवारी सकाळी ११:३० च्या सुमारास सांगोला - महूद रेल्वे गेटवर घडली. याबाबत, पोलीस काॅन्सटेबल गणेश कुलकर्णी यांनी आरोपी अशोक बजरंग हिप्परकर (२१) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिस अधिकारी यांनी खुनातील आरोपीला बेडी न घालता एका पोलीसाबरोबर तेही दुचाकीवरून पाठविण्याचे धाडस केलेच कसे ? आरोपीला एवढी मोकळीक का दिली गेली ? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेनंतर नागरिकांमधून उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments