कोल्हापूर , सोलापुरात मतदार प्रमाण कमी ; विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर ?
एकू ण मतदारांच्या तुलनेत ७५ टक्के मतदार पात्र असतील तरच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्याच्या नियमानुसार, रिक्त होणाऱ्या आठपैकी कोल्हापूर आणि सोलापूर या दोन मतदारसंघांमध्ये ७५ टक्यांपेक्षा कमी मतदार असल्याने या दोन मतदारसंघांतील निवडणूक लांबणीवर जाणार आहे.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मुंबईतील दोन जागा, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे-नंदूरबार आणि अकोला-बुलढाणा या मतदारसंघांतील सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. करोनामुळे राज्यातील पाच महानगरपालिका आणि सुमारे १०० नगरपालिकांची मुदत संपुष्टात येऊनही निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. डिसेंबर महिन्यात आणखी सुमारे २०० नगरपालिका किं वा नगरपंचायतींची मुदत संपत आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत, नगरसेवकांच्या संख्येत करण्यात आलेली वाढ यामुळे सध्या तरी महानगरपालिका आणि नगरपालिकांची निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. कारण बहुसदस्यीय प्रभाग पद्धत तसेच नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने नव्याने प्रभागांची रचना करावी लागेल. ही सारी प्रक्रि या पूर्ण होण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. यामुळे मुदत संपलेल्या नगरपालिकांची मुदत डिसेंबर अखेर होणार नाही.
परिणाम काय?
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य हे मतदार असतात. करोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने मुदत संपलेल्या पालिकांमध्ये सध्या नगरसेवकच नाहीत. सध्या या पालिकांमध्ये प्रशासकांचा कारभार सुरू आहे. नगरसेवकांच्या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर त्याचा परिणाम होणार आहे. यातूनच मुदत संपणाऱ्या आठही मतदारसंघांतील सद्य:स्थितीबाबतची माहिती निवडणूक विभागाने संकलित के ली.
एकू ण मतदारांच्या संख्येच्या ७५ टक्के मतदानास पात्र असल्यास निवडणूक घेण्याची तरतूद आहे. मुंबई महानगरपालिके ची मुदत मार्चमध्ये संपुष्टात येत असल्याने दोन जागांसाठी निवडणूक घेण्यात काहीच अडचण येणार नाही. नागपूरमध्येही फारसा परिणाम होणार नाही. नगरमध्ये ७७ टक्यांच्या आसपास मतदार पात्र ठरतात. धुळे-नंदूरबार आणि अकोला-बुलढाणा मतदारसंघांमध्येही निकषापेक्षा जास्त मतदार पात्र आहेत. कोल्हापूर आणि सोलापूर या दोन मतदारसंघांमध्ये मात्र ७५ टक्यांपेक्षा कमी मतदार शिल्लक आहेत.
एकूण मतदारांच्या तुलनेत ७५ टक्के मतदार मतदानासाठी पात्र नसल्यास निवडणूक पुढे ढकलली जाते. या नियमानुसार कोल्हापूर आणि सोलापूर या दोन मतदारसंघांतील निवडणूक लांबणीवर पडू शकते. या संदर्भातील अंतिम निर्णय हा निवडणूक आयोग घेणार असला तरी कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये पुरेसे मतदार नसल्याने अन्य सहा मतदारसंघांबरोबर निवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. निवडणूक लांबणीवर पडल्यास कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पुन्हा निवडून येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
प्रशासकांची राजवट
राज्यातील पाच महानगरपालिकांसह १०० नगरपालिकांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. या पालिकांमध्ये सध्या प्रशासकांची राजवट आहे. डिसेंबर ते फे ब्रुवारी या काळात २२२ नगरपालिका आणि नगरपंचायतींची मुदत संपुष्टात येईल. नगरसेवकांच्या संख्येत करण्यात आलेली वाढ, बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू झाल्याने प्रभागांची नव्याने रचना करावी लागेल. ही सारी प्रक्रि या पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्याने किमान मार्च-एप्रिलपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा कळीचा मुद्दा आहे. इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण लागू करणे शक्य होणार नाही. ही सारी प्रक्रि या लक्षात घेता निवडणूक लगेचच होण्याची शक्यता कमी आहे.
0 Comments