वेळेचा चहा , वेळेपुर्वी जीवन संपवू शकतो . चहा एक स्लोपॉयझन , संशोधनाअंती . चहापत्ती मधील थिईन व टॅनिन हे विषारी घटक , आजारांचं जाळं वाढवून गळफास घालतात .
ब्रेकिंग : चहापत्ती मध्ये ' थिईन व टॅनिन ' हे उत्तेजक विषारी घटक असतात . ' टॅनिन ' हे जनावरांचे कातडे कमावण्याच्या कारखान्यात , कातडे कडक करण्यासाठी वापरले जाते . पोटात गेलेला चहा सुद्धा नेमकं हेच म्हणजे आतडी कठीण करण्याचं काम करतो . त्यामुळे आतडी कठीण होतं जाऊन , पचनक्रिया कमजोर होत जाते . म्हणून खाल्लेले अन्न पचत नाही , पचलेले पुढे ढकलले जात नाही . हीच बद्धकोष्ठता सर्व आजारांचं मुळ असते . अमेरिकेत शेकडो मृत मनुष्याच्या शरीराचे संशोधन केले , त्यामध्ये ९ ० टक्के मृतशरीरात ' मल ' अवडंबर आढळून आले . एवढी बद्धकोष्ठता मारक ठरते . आणि तीच बद्धकोष्ठता चहामुळे निर्माण होते . तसेच थिईन मुळे ज्ञानतंतू उत्तेजित होतात त्यामुळे प्रारंभी तरतरीत वाटते . पण वारंवार रोज चहा पिण्यामुळे ज्ञानतंतू सारखे उत्तेजित होऊन होऊन , मेंदूची झोप नष्ट होऊ लागते . त्यामुळे शारीरिक विश्रांती कमी होते , हृदयाचे ठोके वाढतात . झोप कमी झाल्यामुळे शरीर , इंद्रिय , अवयवांचे संतुलन बिघडते . पित्त , जळजळ , पोटदुखी , डोकेदुखी ही सारी चहाचीच कृपा . काहीजण म्हणतात , चहा पेक्षा कॉफी बरी . पण तोसुद्धा खुप मोठा गैरसमज आहे . कारण चहाप्रमाणेच कॉफी मध्ये ही ' कॅफिन ' विषारी घटक आहे . तो चहाच्या मानाने दुप्पट घातक असतो . टॅनिन व कॅफिन जास्त शरीरात गेल्यास " कॅन्सर चा धोका अधिक होतो . त्यामुळे तुम्ही चहा , कॉफी , ग्रीन टी , लेमन टी काहीही प्या . चहापत्ती आली की , विषय संपला . मुळात चहापत्ती हीच विष आहे . विडी सिगारेटमधील व सर्व विषारी द्रव्ये चहा , कॉफीत कमी - अधिक प्रमाणात असतात . तीन कप चहा पिणे , म्हणजे एक सिगारेट ओढण्याएवढं विष शरीरात जाते . अर्थात तीन कप चहा पिल्यावर दिवसाला एक सिगारेट ओढतो . इंग्रज गेले परंतु त्यांचा चहा गेला नाही . चहा हा उष्ण पेय असून , भारतासारख्या उष्ण कटिबंधातील प्रदेशात त्याची काहीही गरज नाही . उलट ते आरोग्यास घातक आहे . इंग्रज येण्यापूर्वी भारतात बाहेरून आलेल्या पाहुण्यांना थोडासा गुळ , किंवा गुळ - शेंगा | दिल्या जात . कारण प्रवासामुळे ओढाताणामुळे आपला रक्तदाब व उष्णता वाढलेली असते . गुळामुळे दोन्हीही कमी होते . परंतु चहामुळे त्यामध्ये आणखी वाढ होते . जे पुढे उतारत्या वयात घातक ठरू लागते . त्यामुळे भारतीयांच्या आरोग्यासाठी चहा , कॉफी इ . उष्णपेय बंद झाले पाहिजेत . त्याएवजी आवळा चहा , आयुर्वेदिक चहा , ताक , घरगुती नैसर्गिक कॉफी , आवळा सरबत , लिंबं सरबत , नारळ पाणी , फळांचा रस , मठातील पाणी आरोग्यास लाभदायक !
0 Comments