google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हातभट्टीवर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला ; नऊ जणांवर गुन्हे दाखल

Breaking News

हातभट्टीवर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला ; नऊ जणांवर गुन्हे दाखल

 हातभट्टीवर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला ; नऊ जणांवर गुन्हे दाखल


सोलापूर : हातभट्टी तयार करण्याच्या ठिकाणावर छापा टाकण्यास गेलेल्या सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या पथकावर जमावाने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणत शासकीय वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणास १) विलास लिंबाजी जाधव २) राहुल जाधव ३) संचिता जाधव ४) भाऊ रमेश जाधव ५) रमेश जाधवची पत्नी ( नाव माहित नाही) ६) भरत जाधव ७) भरत जाधवची पत्नी ( नाव माहित नाही. (८) अनिल पुर्ण नाव माहीत नाही ९) बेबाबाई पांडुरंग चव्हाण, सर्व रा. कवठे, भोजप्पा तांडा सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याठिकाणाहून सुमारे 1 लाख 6 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


 पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव क्षीरसागर यांच्या फिर्यादीनुसार हकीकत अशी की, फिर्यादी व सलगरवस्ती पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टॉफ असे प्रोव्हिशन रेड कामी सराईत गुन्हेगार विलास जाधव रा. कवठे, भोजप्पा तांडा, सोलापुर यांचे शेतात गेलो असता तो आम्हास महावितरण कंपनीची विजेची चोरी करून हात भट्टी दारू तयार करताना मिळून आला. 


त्याचेवर कायदेशीर कारवाई करतांना त्याने १० से १५ लोकांना गैरकायदेशीर जमवून सरकारी कामात आडथळा आणत फिर्यादीला तसेच फौजदार सचिन माळी यांना मारहाण करून जिवघेण्या हत्याराने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला व इतर अंमलदारांनासुध्दा लाथाबुक्यानी व दगडानी मारहान करून अश्लिल शिवीगाळ करून सरकारी दुचाकी गाडीचे नुकसान केले आहे. तसेच विनापास परवाना  गुन्हयाचा मुद्देमाल जवळ बाळगला आहे. म्हणुन फिर्यादीची आरोपीतांविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.  तपास पोलीस उपनिरीक्षक मंद्रुपकर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments