google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवमल्हार धनगर समाज वधु वर संस्था , मायाक्का प्रतिष्ठान व राजमाता प्रतिष्ठान आयोजित सांगोला येथे धनगर समाज वधू - वर मेळाव्याचे आयोजन

Breaking News

शिवमल्हार धनगर समाज वधु वर संस्था , मायाक्का प्रतिष्ठान व राजमाता प्रतिष्ठान आयोजित सांगोला येथे धनगर समाज वधू - वर मेळाव्याचे आयोजन

 शिवमल्हार धनगर समाज वधु वर संस्था , मायाक्का प्रतिष्ठान व राजमाता प्रतिष्ठान आयोजित सांगोला येथे धनगर समाज वधू - वर मेळाव्याचे आयोजन


सांगोला / प्रतिनिधी समाजातील उदासीनता आणि आर्थिक अडचण यातून मुला- मुलींना स्थळ पसंद करणे आणी लग्न खर्च हे आर्थिक दृष्ट्या न परवडणारे आहे . हल्लीच्या धकाधकीच्या आणि धावत्या युगात एखाद्या स्थळासाठी करावी लागणारी खटपट याचा विचार करता वधू - वरांच्या पालकांना सोयीस्कर व्हावे यादृष्टीने शिवमल्हार धनगर समाज वधु वर संस्था , मायाक्का प्रतिष्ठान व राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून गटनेते आनंदाभाऊ माने , शिवाजी खरजे व काशीलिंग ( बाबु ) गावडे यांच्या पुढाकाराने धनगर समाज वधु वर मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २१ रोजी करण्यात आले आहे . राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठान या माध्यमातून गटनेते आनंदा भाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली मायाका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काशिलिंग ( बाबू ) गावडे यांनी आज पर्यंतच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत . भुकेल्याला अन्न , विना आधार असलेल्यांना आधार , छत्रछाया नसलेल्यांना निवारा यासह पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षलागवड असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजातील तळागाळातील प्रत्येक गोर - गरीब नागरिकांना कायम आपुलकी आणि आधार देण्याचे काम त्यांनी आज पर्यंतच्या काळात केले आहे . त्याचाच एक भाग म्हणून , आज कोरोना नंतर अर्थव्यवस्था कोलमडली असताना संस्थापक अध्यक्ष काशिलिंग ( बाबू ) गावडे यांच्या संकल्पनेतून वधू - वर मेळाव्याचे आयोजन केले आहे . सदर मेळावा राजमाता मंगल कार्यालय चिंचोली रोड सांगोला येथे आयोजित करण्यात आला असून हा वधू वर मेळावा निशुल्क असणार आहे . मेळाव्यासाठी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे . अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments