मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर दौऱ्यावर -
कार्तिकी एकादशीचा सोहळा उद्या सोमवारी होणार आहे. कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक होणार असून त्यासाठी आज रविवारी रात्री त्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार आहे.आषाढी एकादशीची श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची गेल्या काही वर्षांपासूनची प्रथा आहे.
त्यानुसार मंदिर समितीच्या बैठकीत कार्तिकीच्या महापूजेच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून रितसर आमंत्रण देण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु उपमुख्यमंत्री श्री.पवार यांची भेट होऊ न शकल्याने त्यांच्या स्वीय सचिवांकडे आमंत्रण पाठवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निमंत्रण स्वीकारले असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी ते सपत्निक पंढरपूरला येणार आहेत. दरवर्षी प्रमाणे मंदिर समितीने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेची तयारी केली आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे सोमवारी एकादशी दिवशी पहाटे सव्वा दोन वाजता महापूजेला सुरुवात होणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
0 Comments