माझी वसुंधरा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६२६ ग्रामपंचायतींनी केले फटाके बंदीचे ठराव
सीईओ दिलीप स्वामी यांनी याबाबत घेतलेल्या सततच्या आढावा बैठक व मार्गदर्शन मुळे व दिलीप स्वामी यांचे आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्यातील ज्या ग्रामपंचायतींनी फटाके बंदी चा ठराव घेतलेला आहें त्या ग्रामपंचायतीचे सीईओ स्वामीं यांनी अभिनंदन केले असून इतर ग्रामपंचायतींना ही असे ठराव घेणे बाबत सुचित केले आहे.सोलापूर : सोलापूर जिल्हयातील ६२६ ग्रामपंचायातीने फटाके बंदीचा ठराव केला आहे. जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थानी हा निर्णय घेतला आहे.
पर्यावरणाचे समतोल पृथ्वी, अग्नी,आकाश, जल, वायू या पंचतत्वांवर अवलंबून आहे. या पंचतत्वाचे निगा राखणे सर्वांची जबाबदारी आहे. निसर्गाचे या पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगिकारल्याशिवाय मनुष्य निसर्गसोबत जगू शकणार नाही.आणि जैव विविधतेचे अस्तित्व राहणार नाही. म्हणून याबाबतच्या जागृती करिता शासनाने माझी वसुंधरा हा उपक्रम राज्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.राज्य शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाची सोलापूर जिल्हा परिषद मार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. माझी वसुंधरा या उपक्रमांत जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना सहभागी करून घेण्यात येत आहे. याअंतर्गत सोलापूर जिल्हयातील ७०८ ग्रामपंचायतींनी या अभियान करिता स्वयंस्फूर्तीने नोंदणी करून घेतलेली आहे.माझी वसुंधरा अंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. घन कचरा व्यवस्थपन,वृक्ष लागवड, प्लास्टिक बंदी, हागणदारी मुक्ती, जलसंवर्धन, नदी/तळे पुनर्जीविकरण, सांडपाणी व्यवस्थापन, व इतर माझी वसुंधरा उपक्रमातील महत्वाच्या टप्पा म्हणजे पर्यावरणाचे समतोल करिता हवेची उच्च गुणवत्ता राखणे महत्त्वाचे आहे, यास अनुसरून फटाके बंदी चे आवाहन करण्यात आले होते, यास प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील ६२६ ग्रामपंचायतींनि फटाके बंदी चे ठराव केलेले आहेत. तालुका निहाय फटाके बंदीचा ठराव घेतलेल्या
ग्रामपंचायतीची संख्या
अक्कलकोट - ८२
बार्शी - ६३
करमाळा - ५५
माढा - ९२
माळशिरस - ५५
मंगळवेढा - ५०
मोहोळ - ५५
पंढरपूर - ७२
सांगोला -४६
उत्तर सोलापूर - २४
दक्षिण सोलापूर - ३२
सीईओ दिलीप स्वामी यांनी याबाबत घेतलेल्या सततच्या आढावा बैठक व मार्गदर्शन मुळे व दिलीप स्वामी यांचे आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्यातील ज्या ग्रामपंचायतींनी फटाके बंदी चा ठराव घेतलेला आहें त्या ग्रामपंचायतीचे सीईओ स्वामीं यांनी अभिनंदन केले असून इतर ग्रामपंचायतींना ही असे ठराव घेणे बाबत सुचित केले आहे.
0 Comments