google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : रात्री दोन तासच फटाके उडविण्यास परवानगी

Breaking News

सोलापूर : रात्री दोन तासच फटाके उडविण्यास परवानगी

 सोलापूर : रात्री दोन तासच फटाके उडविण्यास परवानगी


सोलापूर : दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके उडविता येतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ नुसार संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.


दिवाळीच्या कालावधीत १०० संख्येपेक्षा जास्त आणि १२५ डेसीबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडविण्यासही मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही रस्त्यावर अथवा रस्त्यापासून ५० फुट आत कोणतेही फटाके उडविता येणार नाहीत. स्वैरपणे फटाके उडविणे, दारुकाम सोडणे अथवा उडविणे, अग्निबाण सोडण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरावर १२५ डेसीबल आवाज निर्माण करणारे फटाके उत्पादन व विक्रीवरही बंधने घालण्यात आली आहेत. फटाके विक्रीचे स्टॉल लागले असून त्याठिकाणी फटाके विक्री आता सुरु झाली आहे. दिवाळी तोंडावर आल्याने पोलिसांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.असे आहेत निर्बंध...


- रात्री आठ ते दहा यावेळेतच उडविता येणार फटाके

- कोणत्याही रस्त्यावर अथवा रस्त्यापासून ५० फूट अंतरात स्वैरपणे फटाके उडविता येणार नाहीत

- शहरात १४ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी; गर्दी केल्यास होणार आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कारवाई

- फटाक्‍यांच्या आवाजावरही निर्बंध; साखळी फटाका ५० ते १०० असल्यास त्याचा आवाज ११० ते ११५ डेसीबलपेक्षा जास्त नसावा

- साखळी फटाका १०० अथवा त्याहून जास्त असल्यास त्याचा आवाज १२५ डेसीबलपेक्षा जास्त असल्यास होणार कारवाई

- आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र अधिनियम कलम १३१ नुसार होणार कायदेशीर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जास्त आवाजाचे फटाके उडविण्यास बंदी आहे. रात्री आठ ते दहा यावेळेतच फटाके उडविण्यास परवानगी राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच राहणार असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपायुक्‍त, सोलापूर शहर

Post a Comment

0 Comments