google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गावातील आठवडे बाजार होणार सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Breaking News

गावातील आठवडे बाजार होणार सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

 गावातील आठवडे बाजार होणार सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश


नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन

कोव्हिड १९ महामारी मुळे गेले अनेक दिवसांपासून गावातील आठवडे बाजार शहरातील बाजार संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने बंद करण्यात आले होते. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोव्हिड १९ संसर्ग कमी झाल्यामुळे आटोक्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दि.२८ आँक्टोबर पासून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडा बाजार व जनावरांचे बाजार सुरु करण्याची परवानगी परीपत्रकाद्वारे दिली आहे.



आठवडा बाजार सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी बाजारामध्येमध्ये कोव्हिड १९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या महत्वाच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी नियंत्रण ठेवावे. तसेच सदर आटवडा बाजार यांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील. सुरू करणेत येणाऱ्या  आठवडे बाजाराशी संबंधित असणाऱ्या आस्थापनांनी आठवडे बाजार भरणाऱ्या ठिकाणी मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझेशन याबाबतच्या नियमांचे, शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच  आठवडे बाजार सुरू करण्यात यावेत अशा सूचना केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments