google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात चिकनगुनियाची रुग्ण वाढले

Breaking News

सांगोला शहरात चिकनगुनियाची रुग्ण वाढले

 सांगोला शहरात चिकनगुनियाची रुग्ण वाढले


सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरांमध्ये डासांचे प्रमाण वाढल्याने थंडी ताप , डेंगू , चिकनगुनिया या रुग्णाची संख्या वाढली आहे यामुळे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे . चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने शहरातील मोकळ्या जागा रस्त्याच्या कडेला काटेरी वृक्ष व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे शहरासह शहरातील नवीन वसाहतीमध्ये यामध्ये वासुद रोड च्या दोन्ही बाजूकडलास रोडच्या दोन्ही बाजू , मंगळवेढा रोडच्या दोन्ही बाजू , एकतपुर रोडच्या दोन्ही बाजू , चिंचोली रोड च्या दोन्ही बाजू , व मिरज रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या नवीन वसाहती झाली आहेत या सर्वच वसाहतीमध्ये ड्रेनेजची सोय नाही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते तर या नवीन वसाहतीच्या घरामधील वाया जाणारे पाणी ड्रेनेजची सोय नसल्याने इतरत्र कोठेही सोडले असल्याने या पाणी साठलेल्या ठिकाणावर तसेच गवत व काटेरी वृक्ष वाढलेल्या ठिकाणी डासाची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे सध्या सकाळ व संध्याकाळी शहराच्या सर्वच ठिकाणी मधाच्या माशा जशा घोंघावतात त्या प्रकारे डास घोंगावत आहेत सायंकाळच्या वेळी तरी चौका चौकामध्ये या डासामुळे माणसांना उभे राहणे ही अवघड झाले आहे . 


नगरपालिका प्रशासनाने गेल्या अनेक महिन्यापासून डास निर्मुलनाची फवारणी केलेली नाही यामुळे शहरांमध्ये सर्वत्र डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या डासामुळे शहरांमधील बहुतांशी लोकांना थंडी ताप येणे , मलेरिया डेंगू व चिकनगुनिया चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या वाढलेल्या रुग्णा मुळे खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे . नगरपालिका प्रशासनाने मोकळ्या जागेमध्ये असलेली काटेरी वृक्ष व रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत असलेले गवत काढून घ्यावेत गटारी साफ करून गटारी मधील पाणी वाहते ठेवावे व डास निर्मूलनची फवारणी करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे .

Post a Comment

0 Comments