महिला पोलिस कॉन्स्टेबलवर पोलिस उपनिरीक्षकाने केला बलात्कार
दिल्ली पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे . मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला आणि एका पोलिस - सहायक पुरुष उपनिरीक्षकाला सीबीआयने अटक केली आहे . एका पोलिस उपनिरीक्षकाने एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे . या आरोपी पोलिस उपनिरीक्षकाकडून लाच घेताना सीबीआयने त्यांना अटक केली आहे . बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी या अटक केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपी पोलिस उपनिरीक्षकाकडून लाच मागितली होती , दिल्ली पोलिसांनीच याबाबतची माहिती दिली आहे . मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये तैनात एक महिला पोलिस उपनिरीक्षक आणि एक सहायक पोलिस पुरुष उपनिरीक्षकाला सीबीआयच्या टीमने लाच घेताना अटक केली आहे . शनिवारी रात्री सीबीआयने त्यांना अटक केली . विशेष म्हणजे लाच घेतल्याप्रकरणी ज्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली गेली , तीच बलात्काराच्या प्रकरणाचा तपास करत होती , असं दिल्ली पोलिसांनी सांगितल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे . गेल्या ऑगस्टमध्ये दक्षिण जिल्ह्यातील हौज खास पोलिस स्टेशनमध्ये तैनात महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले . पीडित महिला कॉन्स्टेबलने विभागातील पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप केला होता . पोलिस उपनिरीक्षक मनोज याने इमर्जन्सी ड्युटीदरम्यान तिला बोलावले यानंतर तो तिला मुनीरका येथील एका घरात घेऊन गेला . तिथे तिला पिण्यासाठी कोल्ड्रींक दिले . ते कोल्ड्रींक प्यायल्यावर तिची शुद्ध हरपली . यानंतर पोलिस उपनिरीक्षकाने तिच्यावर बलात्कार केला आणि आक्षेपार्ह फोटोही काढले , असा आरोप पीडित महिला कॉन्स्टेबलने केला आहे . एकीकडे , दिल्ली पोलिसातील पोलिस उपनिरीक्षकावर सहकारी महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे . दुसरीकडे , या बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला हे बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी आरोपी पोलिस अधिकाऱ्याकडून लाच घेताना अटक करण्यात आली आहे .
0 Comments