मंगळवेढयातील काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळणार बळ; डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचा आजपासुन तालुका दौरा -
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील हे आजपासुन दि.८,९ व १० आक्टोबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील ८ पंचायत समिती गणाचा व मंगळवेढा शहराचा कार्यकर्ता संवाद दौरा करणार असल्याची माहिती मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार यांनी दिली.आज शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर सकाळी १० वाजता हुन्नूर, दुपारी १२ वाजता भुयार चिखलगी दुपारी ३ वाजता पाटकळ, सायंकाळी ५ वाजता गुंजेगाव.शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर २१ रोजी सकाळी १० वाजता मरवडे, दुपारी १२ वाजता हुलजंती, दुपारी ३ बोराळे, सायंकाळी वाजता ५ वाजता ब्रह्मपुरी.रविवार दिनांक १० ऑक्टोबर सकाळी ११ वाजता मंगळवेढा शहर वरील प्रमाणे ग्रामीण भागात व शहरात दौरा आयोजित केला आहे.सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी व उपस्थित रहावे असे आवाहन युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप फडतरे यांनी केले आहे.
0 Comments