google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिवणे शाखेत फोडली तिजोरी !

Breaking News

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिवणे शाखेत फोडली तिजोरी !

 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिवणे शाखेत फोडली तिजोरी !


सांगोला : बँकेवर भरदिवसा दरोडे पडत असताना आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगोला तालुक्यातील एका शाखेत रात्रीच्या वेळेस बँकेची तिजोरी फोडून लाखो रुपये लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. 


सर्वात अधिक सुरक्षित म्हणून बँकांकडे पहिले जाते परंतु अलीकडे बॅंकातच दरोडा आणि चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगोला तालुक्यातील शिवणे शाखेत रात्री असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांसमोर या चोरीचे आव्हान उभे राहिले.  


गॅस कटरने खिडकीचे गज कापून अज्ञात चोरटयांनी बँकेत प्रवेश केला आणि बँकेची तिजोरी फोडून लाखो रुपये लंपास केले. ही  सुमारे सात लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चोरांनी केवळ तिजोरी फोडून रक्कम लंपास करण्यावर समाधान मानले नाहीत तर बँकेतील महत्वाची कागदपत्र बाहेर आणून जाळून टाकली आहेत. त्यामुळे चोरांचा उद्देश केवळ चोरी करणे एवढाच नसावा असे दिसते. 


शिवणे गावात ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या या बँकेच्या शाखेच्या मागील बाजूस धूर येत असल्याचे एकाच्या लक्षात आले. सकाळी आपले हॉटेल उघडण्यासाठी आलेल्या हॉटेल मालकाला हा धूर पाहून काहीशी शंका आली. त्यांनी तातडीने गावाचे सरपंच याना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत हा प्रकार झाला असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहाणी केली आहे.

Post a Comment

0 Comments