google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा कार्याध्यक्षपदी मकरंद अंकलगी तर सांगोला तालुका अध्यक्षपदी प्रा.दत्तात्रय वाघमारे यांची निवड...

Breaking News

जिल्हा कार्याध्यक्षपदी मकरंद अंकलगी तर सांगोला तालुका अध्यक्षपदी प्रा.दत्तात्रय वाघमारे यांची निवड...

 जिल्हा कार्याध्यक्षपदी मकरंद अंकलगी तर सांगोला तालुका अध्यक्षपदी प्रा.दत्तात्रय वाघमारे यांची निवड...



महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग अध्यक्षा विद्या कदम आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक ॲड.महादेव कांबळे यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्षा कविता कदम यांनी नुकतीच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या काही नूतन निवडी जाहीर केल्या. यामध्ये सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी मकरंद अंकलगी (सांगोला) यांची तर सांगोला तालुका अध्यक्षपदी प्रा.दत्तात्रय वाघमारे यांची निवड केली असून त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र दिले आहे.मकरंद अंकलगी हे सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून ते उत्कृष्ट कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अनेक चित्रपट,मालिका यामध्ये त्यांनी काम केले असून नाट्य क्षेत्रांमध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे. त्याचबरोबर सांगोला तालुका कॉंग्रेस पक्षात ते सक्रिय सहभागी असतात.   यामुळे जिल्ह्यातील एका महत्वपूर्ण पदावर त्यांची नियुक्ती करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे.



 तर प्रा.दत्तात्रय वाघमारे हे उत्कृष्ट कवी व कथाकार असून मुंबईच्या कोमल प्रकाशना कडून त्यांचा 'उचल' हा कथासंग्रह लवकर प्रकाशित होणार आहे. कविता, कथाकथन व वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. नुकतेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांचे हे कार्य पाहता सांगोला तालुक्यांमध्ये सांस्कृतिक विभागाची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने सोपवलेली आहे. 


सदर दोन्ही निवडीबद्दल मा. प्रांतिक सदस्य पी.सी.झपके व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष ॲड. महादेव कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील भोरे, सोशल मीडिया राज्य समन्वयक रवीप्रकाश साबळे, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, शहर कार्याध्यक्ष सुरेश डांगे, युवक अध्यक्ष काशिनाथ ढोले, ओबीसी सेल शहराध्यक्ष फिरोज मनेरी, जेष्ठ नेते विलास पाटील यांनी सदर निवडीचे स्वागत केले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते रविंद्र कांबळे, मिलिंद फाळके, प्रसाद खडतरे, प्रशांत रायचूरे, नरेंद्र होनराव सर ,  हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments