बार्शी तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला मृतदेह
बार्शी : गावात स्मशानभूमीच नाही ,आम्ही कोठे अंत्यसंस्कार करायचे , दोनदा लाकडे ठेवली दोनदा काढायला लावली आम्हाला जागा दिल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत असे सांगत तहसील कार्यालयासमोर दुपारी दोनच्या दरम्यान मृतदेह आणून ठेवत प्रमिला झोंबाडे यांनी टाहो फोडला .वालवड ( ता . बार्शी ) येथे अद्यापही स्मशानभूमी नसून गावातील नागरिकाचा मृत्यू झाला किं आपापल्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत पण ज्यांना कोणतीही शेतजमीन नाही ,
जागा नाही यांचेवर अशी वेळ वारंवार येत असल्याचे झोंबाडे सांगत होत्या .वालवड येथे शुक्रवारी रात्री अनिता गोकुळ कांबळे ( वय 32 ) विवाहितेचे अल्पशा आजाराने निधन झाले झोंबडे यांच्या त्या भावजय आहेत. अंत्यसंस्कार कोठे करायचा हा प्रश्न निर्माण झाला स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न वादात आहे गेल्या वर्षीही माझ्या आजीचे निधन झाले त्यावेळी आणि आजही दोनदा लाकडे अंत्यसंस्कारासाठी नेली पण अडवणूक करण्यात आली , लाकडे काढायला लावली तहसील कार्यालयासमोर उपोषण , धरणे आंदोलन केले आश्वासनाशिवाय काहीं मिळाले नाही
कायमस्वरुपी तोडगा निघत नाही प्रशासनाला जाग यासाठी मृतदेह तहसील कार्यालय येथे आणला असल्याचे कुटुंबिय सांगत होते .घटनेची माहिती प्रशासनाला समजताच एकच गोंधळ उडाला तहसीलदार , पोलिस निरीक्षक , सहायक पोलिस निरीक्षक महिला पोलिसांसह मोठा पोलिस बंदोबस्त तहसील कार्यालयासमोर तैनात करण्यात आला .अखेर तहसीलदार सुनील शेरखाने आणि पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी कुटुंबियाशी चर्चा करुन पोलिसांच्या फौजफाट्यासह मृतदेह घेऊन वालवड येथे गेले आहेत .

0 Comments