अपंग पुतणीवर काकाचा बलात्कार
मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर गुप्तांगावर वार
मुंबई भिवंडित 16 वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 16 वर्षीय पुतणीवर 48 वर्षीय काकाने बलात्कार केला आहे.
काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने अत्याचार केला. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी काकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे , मुंबई आणि अमरावतीच्या महिला अत्याचाराच्या घटनांनी राज्यात क्षोभ वाढलेला असताना ही माणुसकी आणि नात्यावरचा विश्वास उडावा अशी घटना समोर आल्याने मुंबईत संताप व्यक्त केला जात आहे या घटनेत आरोपी काकाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतल्याने परिसरात वातावरण शांत असले तरी तणावपूर्ण आहे
0 Comments