google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्राहकांनी नवीन वीज योजनांचा लाभ घ्यावा--आनंद पवार लक्ष्मीनगर येथे जीवन ज्योती योजनेंतर्गत नवीन वीज जोडणीचा शुभारंभ

Breaking News

ग्राहकांनी नवीन वीज योजनांचा लाभ घ्यावा--आनंद पवार लक्ष्मीनगर येथे जीवन ज्योती योजनेंतर्गत नवीन वीज जोडणीचा शुभारंभ

 ग्राहकांनी नवीन वीज योजनांचा लाभ घ्यावा--आनंद पवार लक्ष्मीनगर येथे जीवन ज्योती योजनेंतर्गत नवीन वीज जोडणीचा शुभारंभ




सांगोला (प्रतिनिधी) वीज ग्राहकांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घ्यावा,जेणेकरून वीज चोरीला आळा बसेल,नवीन कनेक्शन मधून संपूर्ण कुटूंबाला आणि समाजाला किंबहुना गावाला वीज जोडणीच्या माध्यमातून प्रकाशाकडे नेण्याचा महावितरणचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन सांगोला महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी व्यक्त केला. लक्ष्मीनगर ता सांगोला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनज्योती प्रकाश योजनेंतर्गत नवीन वीज जोडणी झालेल्या नूतन वीज कनेक्शनच्या उदघाटन समारंभाच्या छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते. या उदघाटन समारंभाच्या वेळी आचकदाणी महावितरण उप विभागाचे शाखाप्रमुख सचिन आटपाडकर,गणेश जाधव,  उपसरपंच सौ स्वाती साठे, माजी सरपंच धनाजी नरळे,प्रगतशील बागायतदार यशवंत नरळे,ग्रा सदस्य रामचंद्र गोडसे,दीपक बाड, माजी उपसरपंच भगवान साठे,सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ लोखंडे,धोंडिबा गोडसे,लाभार्थी कांतीलाल साठे,आदि मान्यवर उपस्थित होते.



या वेळी ग्रामपंचायत लक्ष्मीनगर याचेवतीने आनंद पवार ,सचिन आटपाडकर, गणेश जाधव,आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वीज वितरण विभागाच्या विविध अडचणी सरपंच धनाजी बाड आणि उपसरपंच सौ स्वाती साठे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितल्या आणि त्या तत्परतेने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन या वेळी आनंद पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले,गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या स्मशानभूमीतील वीज जोडणीचा प्रश्न चार दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनज्योती योजनेचा गावातील अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन या वेळी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम दादा गोडसे यांनी केले, तर आभार उपसरपंच स्वाती साठे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई मुबारक मुलाणी,पाणी पुरवठा कर्मचारी कुंडलिक जावीर यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments