सांगोला पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी सुप्रिया चव्हाण यांच्याकडे अतिरिक्त पदभार
तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी घेतला शिराळा पंचायत समितीचा पदभार
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांचा ३ वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांची प्रशासकीय बदली सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदी बदली झाली आहे. गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी शिराळा पंचायत समितीचा पदभार स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार आता अतिरिक्त म्हणून मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आज गुरुवारी सांगोला पंचायत समिती कार्यालयात हजर राहून कामकाज पाहणार असल्याचे समजत आहे.
तत्कालीन गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी २५ मे २०१८ रोजी सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी संतोष राऊत यांनी पदभार स्वीकारला होता. एक कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी एक ओळख निर्माण केली होती. तीन वर्षाचा कार्यकाळामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या प्रशासकीय बदलीनंतर त्यांनी शिराळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता रिक्त सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नव्याने कोणाकडे पदभार जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु त्या ठिकाणी नव्याने स्वतंत्र गटविकास अधिकारी पदी अद्यापही कोणाची निवड झाली नाही. त्यामुळे मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
0 Comments