ब्रेकिंग : मुख्याध्यापक पदोन्नतीला उच्च न्यायालयाचा 'स्टे' ; भावी मुख्याध्यापक पळापळ
सोलापूर : गेली कित्येक दिवसांपासून ज्या मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रतिक्षा होती ती गुरुवार 16 सप्टेंबर 2021 रोजी अगदी सुरळीतपणे पार पडली. कोणाचीही काहीही तक्रार नाही, गोंधळ नाही, हसत खेळत ही प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन समुपदेशन पध्दतीने पार पडली. दिव्यांग, अस्थिव्यंग व इतर अशा 200 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करून समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली.
यामध्ये एकुण 56 दिव्यांग शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. मागील पंधरा वर्षांपासून रखडलेली प्रक्रिया प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थीत पार पडल्याबाबत तत्कालीन शिक्षणाधिकारी राठोड यांनी प्रशासन विभागाचे आभार मानले. दिव्यांग संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, डेप्युटी सीईओ चंचल पाटील शिक्षणाधिकारी राठोड यांचा सत्कार केला, या निवडीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले होते, या 200 मुख्याध्यापकांना ऑर्डर देण्यात येणार होत्या
मात्र दरम्यान एका अपंग शिक्षकाने या पदोन्नती विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यामुळे या पदोन्नतिला न्यायालयाने स्टे दिला आहे त्यांची सुनावणी शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे, या पदोन्नती मुळे काही मुख्याध्यापक 30 सप्टेंबर रोजी रिटायर्ड होणार होते त्यांची चांगलीच अडचण झाली आहे, असे अनेक शिक्षक गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये सीईओ स्वामी यांना भेटण्यासाठी आले होते. उच्च न्यायालयाचा विषय असल्याने प्रशासन काय करू शकत नाही, मात्र ज्या अपंग शिक्षकाने याचिका दाखल केली, त्यावर कोणताही अन्याय झालेला नाही, निकाल 200 मुख्याध्यापक यांच्या बाजूने लागेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. दरम्यान पदोन्नती झालेले मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटना याविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
0 Comments