स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांना पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
सांगोला (प्रतिनिधी): शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेचा पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार विश्वविक्रमी आमदार स्व.भाई गणपतराव देशमुख यांना जाहीर झाल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केली आहे.
यावेळी मा. शरदचंद्रजी पवार म्हणाले, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अथक प्रयत्न केले. गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी अतोनात प्रयत्न केले. गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी आपले आयुष्य झोकून दिले. अशा या नेत्याला डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार घोषित करताना मनाला आनंद होत आहे. या पुरस्काराचे स्वरूप २ लक्ष ५० हजार रुपये अधिक वाट खर्च, शाल, श्रीफळ या पद्धतीने देण्यात येणार असून, आपण या पुरस्कारासाठी ज्या व्यक्तीची निवड केली ते आपल्या हयात नाहीत. परंतु त्यांनी ज्ञानाच्या विचाराला सतत पाठिंबा दिला. आम्ही गेली सतत वर्षे बघतो विधानसभेला त्यांची कधी गैरहजेरी दिसली नाही. ज्यांनी विधिमंडळामध्ये ११ वेळा निवडून जाण्याचा विश्वविक्रम केला. शेती आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले. गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी अनेक चळवळीमध्ये ते सहभागी झाले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक होते. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी योगदान दिलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं. १९७८ ते ८० या काळामध्ये पुलोद सरकार मध्ये
कृषी आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून काम बघितलं. नंतर पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार १९ ऑक्टोंबर १९९९ ते २००२ मध्ये रोजगार हमी खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे त्यांनी काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक ज्या समित्या आहेत. त्या समित्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. आणि नवीन विधानसभा झाल्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून गणपतराव देशमुख यांना ३ वेळा संधी दिली. १९८२ सालापासून रयत शिक्षण संस्थेचे ते जनरल लॉजीस्ट सभासद होते. आणि २०१७ सालापासून संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. आणि अन्यायाच्या विचारांचा एक खंदा पुरस्कर्ता आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये जो लहान घटक आहे. त्या लहान घटकासाठी आपलं आयुष्य झोकून देणारे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही. पण त्यांच्या कामाचा सरस आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि म्हणून हा २०२०-२१ चा पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार आपण स्व.मा.आम. गणपतराव देशमुख यांना जाहीर करत आहोत.
0 Comments