google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दोन कोटी खर्च : सांगोल्याच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली डाळिंबासाठी जिल्ह्यात साकारलं राज्यातील दुसरं मोठं शीतगृह !

Breaking News

दोन कोटी खर्च : सांगोल्याच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली डाळिंबासाठी जिल्ह्यात साकारलं राज्यातील दुसरं मोठं शीतगृह !

 दोन कोटी खर्च : सांगोल्याच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली डाळिंबासाठी जिल्ह्यात साकारलं राज्यातील दुसरं मोठं शीतगृह !


 सांगोला : तालुक्यातील शेतकऱ्यांसह डाळिंब उत्पादक शेतकन्यांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली . राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सुमारे २ कोटी रुपये खर्चुन सांगोला येथील वखार महामंडळाच्या ८४० मेट्रिक टन क्षमतेच्या शीतगृहाचे शीतगृहाचे ( कोल्ड स्टोअरेज ) काम पूर्ण झाले आहे . लवकरच हे शीतगृह शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे . याबरोबरच १८०० मेट्रिक टन क्षमता असलेल्या गोडावूनचे कामदेखील सुरु होणार असल्याचे साठा अधीक्षक महेश सलगरे यांनी सांगितले . राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने ७५ टक्के व वखार महामंडळाने २५ टक्के असे सांगोला शीतगृहासाठी सुमारे २ कोटी रुपये मंजर केले होते .


दरम्यान , ऑगस्ट २०१० मध्ये वखार महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एम . एम . आरतानी सांगोल्यात आले होते . त्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी शीतगृह देण्याचे मान्य केले होते . त्याचबरोबर १८००  मेट्रिक टन क्षमतेच्या गोडावून उभारणीसाठी कृषी उत्पन्न बाजार  समितीने २० गुंठे जागा ३० वर्षांच्या भाडेतत्वावर वखार महामंडळाला दिली आहे . दरम्यान , वखार महामंडळाच्या शीतगृहाच्या उभारणीनंतर कृषी मालाची साठवणूक करणे शेतकरी व व्यापाऱ्यांना सुलभ होणार आहे .

Post a Comment

0 Comments