google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अल्पवयीन मुलीशी संमतीने शरीरसंबंध हाही बलात्कारच कोर्टाने शिकवला वासनांधांना धडा

Breaking News

अल्पवयीन मुलीशी संमतीने शरीरसंबंध हाही बलात्कारच कोर्टाने शिकवला वासनांधांना धडा

अल्पवयीन मुलीशी संमतीने शरीरसंबंध हाही बलात्कारच कोर्टाने शिकवला वासनांधांना धडा



नागपूर , वृत्त चांगल्या - वाईटाची. समज नसलेल्या अल्पवयीन  मुलींना विविध प्रलोभने दाखवून वासनेची शिकार  बनवणाऱ्या नराधमांना कठोर धडा शिकवणारा निर्णय मुंबई  हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने  दिला . अल्पवयीन मुलीसोबत  तिच्या सहमतीने शरीरसंबंध  ठेवणे हाही बलात्कारच होतो ,


असे कोर्टाने स्पष्ट करून संबंधित आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे . न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निकाल दिला . आरोपीने बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या सहमतीचा मुद्दा म डला होता . त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही , असा दावा आरोपीने केला . कोर्टाने हा मुद्दा फेटाळूनलावला.अल्पवयीनमुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच  महत्त्व नाही , असे निकालात नमूद  केले . गजानन देवराव राठोड असे आरोपीचे नाव आहे . तो यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील रहिवासी आहे . २०१८ मध्ये विशेष सत्र न्यायालयाने त्याला मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात  दोषी ठरवून कमाल १० वर्षे सश्रम कारावास व ११ हजारांच्या दंडाची  शिक्षा सुनावली होती .

Post a Comment

0 Comments