google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अभिजित पाटील यांच्या रुपाने संपणार कारखान्याचा नऊ वर्षांचा वनवास

Breaking News

अभिजित पाटील यांच्या रुपाने संपणार कारखान्याचा नऊ वर्षांचा वनवास

 अभिजित पाटील यांच्या रुपाने संपणार कारखान्याचा नऊ वर्षांचा वनवास 


सांगोला तालुका म्हणजे महाराष्ट्र  राज्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जाते . सांगोला तालुक्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ तसेच ऊस लागवडी खालील अत्यल्प क्षेत्रयामुळे गेल्या काही वर्षापासून बंद असलेला सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर येत्या गळीत हंगामापासून पूर्ण क्षमतेने सुरू  होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली 

 

धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चे प्रमुख अभिजीत  पाटील आणि सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्यात भाडेतत्वावर कारखाना सुरू करण्याचा करार झाल्याने येत्या गळीत हंगामापासून  कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याचे धुराडे अखेर बंदा पेटणार  असल्याने सांगोला तालुक्यातील बळीराजा आनंदित झाला आहे . शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असणारा तालुका म्हणून सांगोला तालुका राज्यभर ओळखला जात होता . 


पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष  असल्याने ऊस लागवडी खालील क्षेत्र  हे अत्यल्प होते . त्यामुळे गेल्या काही  वर्षांपासून उसाअभावी सांगोला तालुका शेतकरी सहकारी कारखाना बंद अवस्थेत होता . परंतु गेल्या दोन वर्षात नीरा उजवा कालबा , टेंभू योजना , म्हैसाळ योजना , तसेच सांगोला शाखा कालवा या सिंचन बोजनांचे पाणी सांगोला तालुक्याच्या चोहोबाजूंनी फिरल्याने तालुक्यात उसाची लागवड प्रचंड प्रमाणात झाली आहे . तालुक्यातील शेतकन्यांची भावना लक्षात घेऊन सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपकआबा साळुखे पाटील  यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगोला कारखाना लवकरात  लवकर सुरू करण्याची विनंती केली होती . यानुसार मुंबई येथे सह्याद्री  अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील , कारखान्याचे चेअरमन मा.आम , दिपकआबा साळुखे पाटील , सर्व संचालक मंडळ , धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चे प्रमुख अभिजित  पाटील , महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक ( शिखर बैंक ) चे चेअरमन मा.अनासका  साहेब व कार्यकारी संचालक देशमुख साहेब यांच्यात बैठक पार पडली . 


या  बैठकीत सांगोला तालुका शेतकरी  सहकारी साखर कारखाना धाराशिव  साखर कारखाना प्रा.लि. चे प्रमुख  अभिजीत पाटील यांना भाडेतत्त्वावर  चालविण्यास देण्याचे सर्वानुमते ठरले .यानंतर अभिजित पाटील यांनी  सांगोला तालुका शेतकरी सहकारी  साखर कारखान्याची प्रत्यक्षात संपूर्ण  पाहणी करून येत्या गळीत हंगामात  पासून पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला . धाराशिव साखर कारखाना प्राय . लि.चे सांगोला बेथील कारखाना हे चौथे बुनिट आहे . चालू गळीत हंगामापासून सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू होणार असल्याने सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच सर्वच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .

Post a Comment

0 Comments