रुग्णानेच केला रुग्णाचा खून ; सोलापुरमधील धक्कादायक प्रकार !
सोलापूर : सोलापुरातल्या Solapur श्री.छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.एका रुग्णाने दुसऱ्या वयोवृद्ध रुग्णाला सलाईनच्या रॉडने Saline Rod मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काल रात्रीचा हा प्रकार असून उपचारादरम्यान ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या Solapur Civil Hospital बी ब्लॉक मधील हा प्रकार आहे. गेल्या काही महिन्यापासून १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेघर असलेल्या ७० वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले होते .
सलाईनच्या रॉडने मारहाण;
याच वॉर्डात फुप्फुसाच्या Lungs विकारावर इलाज करण्यासाठी युसूफ पिरजादे या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. काल रात्री याच युसूफ पिरजादेने सलाईनच्या रॉडने मारहाण केली. यात ७० वर्षीय इसम जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी ट्रॉमा केअर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे दरम्यान या साऱ्या प्रकारामुळे सिव्हिल हॉस्पिटल मधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोव्हीड Covid 19 आणि इतर साथीच्या रोगांमुळे सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून बेघर लोकांची सोय करण्यात येत नाही त्यामुळे वार्डात रुग्ण दाटीवाटीने राहतात. घाणीचे साम्राज्य पसरून अनेक वादविवादाच्या घटना घडत असतात. त्यातूनच अशा प्रकारची धक्कादायक घटना झाल्याची सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.
0 Comments