जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू
जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...पंढरपूर - रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्ग मध्ये सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील शेतकरी डॉक्टर भारत आप्पाराव पाटील यांची 26 गुंठे जमीन गेली आहे. परंतु अद्याप या शेतकऱ्याला जमीन भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. महसूल व भूसंपादन अधिकाऱ्यांच्या दिरंगाई विरोधात शेतकरी डॉक्टर भारत पाटील यांनी सांगोला
तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.डॉक्टर भारत पाटील हे बेळगाव येथे राहतात उदनवाडी तालुका सांगोला येथे त्यांची शेतजमीन आहे या जमिनीपैकी 26 गुंठे जमीन रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्ग मध्ये गेली आहे. इतर शेतकऱ्यांना भूसंपादन विभागाकडून योग्य तो मोबदला देण्यात आलेला आहे. परंतु डॉक्टर भारत पाटील यांना अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नाही.जमिनीच्या मोबदल्यासाठी बेळगावच्या डॉक्टरचे सांगोल्यात उपोषण...महसूल विभाग व भूसंपादन विभागातील अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून व भेटून ही अद्याप मोबदला मिळालेला नाही. शासकीय नियमानुसार जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी आखेर डॉक्टर भारत पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला बहुजन ब्रिगेड संघटनेने पाठिंबा दिला आहे.
0 Comments