google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोमवार २० सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यातील जप्त केलेल्या वाळूचा लिलाव

Breaking News

सोमवार २० सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यातील जप्त केलेल्या वाळूचा लिलाव

 सोमवार २० सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यातील जप्त केलेल्या वाळूचा लिलाव


सांगोला ( प्रतिनिधी ) : सांगोला तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीमधील जप्त केलेल्या वाळूचा लिलाव सोमवार दि .२० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचे निजी कक्षात करण्यात येणार आहे . 


शासकीय धान्य गोदाम , सांगोला येथील १३० ब्रास व पोलिस स्टेशन सांगोला येथील १७ ब्रास वाळू उपलब्ध आहे .वाळू लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी वर नमूद ठिकाणी असणारे वाळू साठ्याची पाहणी करावी व लिलावात भाग घेण्याकरीता दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचेकडे सादर करावा , असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांचेवतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments