वनविभागाच्या सुरक्षा रक्षकास काठीने मारहाण सहा जणांविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल
सांगोला : वनविभागाच्या कार्यक्षेत्रात जनावरे फिरवू नका , ती बाहेर घेऊन जावा असे का म्हणाला , या कारणावरून सहाजणांनी मिळून जातिवाचक शिवीगाळ करून सुरक्षारक्षकास मारहाण केली . यावेळी | त्यांनी त्याच्या खिशातील चार ते पाच | हजार रुपयेही काढून घेतले . ही घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या | सुमारास हटकर - मंगेवाडी ( ता . सांगोला ) येथे घडली . हटकर - मंगेवाडी येथील अक्षय शामराव मोरे हा हटकर मंगेवाडी , पाचेगाव , राजुरी , निजामपूर येथील वनविभागात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे . घटनेच्या आधी दोन दिवस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जनावरे राखण करणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपयांप्रमाणे केलेला दंड वसूल करीत होता . दरम्यान , शनिवारी दुपारी गावातील | काही नागरिक फॉरेस्टच्या हद्दीमध्ये | जनावरे घेऊन चरण्यासाठी आले होते .यावेळी अक्षय मोरे याने तुम्हाला आमच्या साहेबांनी दंड केला आहे . तरीही तुम्ही जनावरे का घेऊन आला , तुमची जनावरे वन कार्यक्षेत्रातून बाहेर काढा असे म्हणाला . त्यानंतर उमेश चव्हाण , बापू चव्हाण , दादा भुसनर , सौदा शेख , नवनाथ चव्हाण , शशिकांत पुजारी यांनी त्यास जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली , तर उमेश चव्हाण , शशिकांत पुजारी , बापू चव्हाण यांनी त्यांच्याकडून दंडाचे वसुली केलेले चार ते पाच हजार रुपयेही काढून घेऊन सर्वजण पसार झाले . याबाबत अक्षय मोरे यांनी सहाजणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे .
0 Comments