google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा;स्थगितीची मुदत संपली सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; स्थगितीची मुदत संपली

Breaking News

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा;स्थगितीची मुदत संपली सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; स्थगितीची मुदत संपली

 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा;स्थगितीची मुदत संपली सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; स्थगितीची मुदत संपली 


राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगितीची मुदत संपली आहे. राज्य सरकारने या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिला नसल्याने २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसह, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू के ली जाईल.


राज्यातील विविध ६७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्य सरकारने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका  सहा वेळा पुढे ढकलल्या होत्या. एप्रिल महिन्यात काढलेल्या आदेशानुसार या संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. राज्यात सध्या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्य कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात संके त दिले होते.


राज्यात विविध प्रकारच्या दोन लाख ५८ हजार ७८६ सहकारी संस्था आहेत. त्यापैकी ६७ हजार संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. करोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांत निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. त्या वेळी ४५ हजार २७६ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. ही संख्या आता ६७ हजारांवर पोहोचली असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.


दरम्यान, केंद्र सरकारने करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून गरज असल्यास स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, निवडणूक स्थगितीची मुदत ३१ ऑगस्टला संपल्यानंतर राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचे आदेश, सूचना दिलेल्या नसल्याने या संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या हाती आहे.


सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. पुन्हा स्थगिती देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप आदेश आलेला नाही. त्यामुळे प्रलंबित असलेल्या निवडणुकांबाबत प्राधिकरणाकडून निर्णय घेतला जाणार आहे.


– यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

 परळीत उघडकीस आला असा श्रीमंत भिकारी.......!_पिशवी चोरीची भिक्षुकाची पोलीसात तक्रार;तीन तासात तपास_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी         भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो. पण या भिकारी माणसाकडे काय असणार असे म्हणुन दुर्लक्ष केले जाते मात्र परळीत पिशवी चोरीच्या घटनेत तपासातुन खरोखरच श्रीमंत भिकारी उघडकीस आला आहे.वैद्यनाथ मंदिर समोर बसणार्या एका भिक्षुकाकडे तब्बल पावणेदोन लाख रुपये जमापुंजी असल्याचे दिसून आले.पोलीसांनी तीन तासात या पिशवी चोरीच्या घटनेचा तपास लावला आहे.         रात्रंदिवस मेहनत केली तरी एवढी कमाई करू शकत नाहीत एवढी रक्कम एखाद्या भिक्षुकाकडे सापडली तर कोणालाही आश्चर्य वाटु शकते.भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो, पण या भिकारीच्या संपत्ती पुढे आपण भिकारी असल्याचं आपल्याला दिसून येईल. मुंबईतले  भिकारी आपल्या संपत्तीबद्दल  चर्चेत असतात. पण परळीतील भिकारी ही काही कमी नाहीत हे एका घटनेने आज पुढे आले आहे.          बाबूराव नाईकवाडे नावाची


  गंगाखेड रोडवर करम-निळा जवळ भिषण अपघात;चार जण जागेवर ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी गंगाखेड रोडवर करम ते निळा फाट्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन चार जण जागेवर ठार झाल्याची घटना रात्री ८.०० वा. सुमारास घडली आहे. सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.     गंगाखेड रोडवर करम ते निळा फाट्या दरम्यान खोरी नावाने ओळखले जाणार्या ठिकाणी एक अॅटोरिक्षा व टिप्परची जोराची धडक होऊन भयानक अपघात घडला आहे. . या भिषण आपघातात अॅटोरिक्षातील चार जण जागीच गतप्राण झाले आहेत. मयत अंबाजोगाई चे असल्याचे प्रथमदर्शनी समजते. अॅटोरिक्षातील लोक गंगाखेड जवळील झोलपिंपरी येथे एका लग्नाहून अंबाजोगाईला परत जात होते अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान हायवे पोलीस व सोनपेठ पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


  परळीत अॅन्टिकरप्शन विभागाची मोठी कारवाई! परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई:१० लाखांची लाच स्विकारताना वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन चतुर्भुज परळी वैजनाथ, प्रतिनिधी     बॅंकेतून कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना परळीतील वैद्यनाथ अर्बन को आॅप बॅंकेच्याचेअरमनला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  कळंब येथील एका किराणा व्यापार्याला कर्ज मंजूर केल्याचे प्रकरण असुन  तक्रारदार यांचे सन 2018 मध्ये सी सी अकाउंट चे अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे रु. 15,000,00/-  मागणी करून, रु.10,000,00/- ही प्रत्यक्ष स्वीकारून उर्वरित रू.5,000,00/-  नंतर घेण्याचे सांगितले.ही लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभाग युनिट- औरंगाबादने  स्विकारताना चेअरमन अशोक जैन यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सापळा अधिकारी-श्री. गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद. श्री पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील,  मिलिंद इप्पर,  पोशि. विलास चव्हाण,  चागंदेव बागुल, ला. प्र. वि. औरंगाबाद मार्गदर्शक-मा.

Post a Comment

0 Comments